शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

धान्य बँकेचे जाळे आता महाराष्ट्रभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:49 IST

पन्नास हजार किलो धान्य देण्याची क्षमता; एक गाव, एक धान्य बँक, दोन संस्था

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : भुकेलेल्यांच्या पोटाला अन्न पुरवण्याचा संकल्प केलेल्या उज्ज्वला बागवाडे यांच्या ‘धान्य बँक’ या अभिनव उपक्रमाचे जाळे आता महाराष्ट्रभर पसरणार आहे. गरजू सामाजिक संस्थांना अन्नधान्य पुरविण्याचा संकल्प त्यांनी नव्या वर्षांत केला आहे. या गरजू संस्था असणाऱ्या गावांत त्या धान्यबँकेचे केंद्र सुरू करणार आहेत. ‘एक गाव, एक धान्य बँक, दोन संस्था... एक सुरूवात’ अशी संकल्पना वुई टुगेदर संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.आतापर्यंत या संस्थेने आपल्या धान्यपेढीतून हजारो किलो धान्य पुरवले आहे. गोरगरिबांच्या अन्नदात्री ठरलेल्या बागवाडे यांनी सुरूवातीला बीड जिल्ह्यातील सेवाश्रम, शांतीवन आणि श्रद्धा फाऊंडेशन या संस्था दत्तक घेतल्या. सध्या १९ संस्थांना वुई टुगेदरच्या माध्यमातून धान्य पुरविले जात आहे. त्यापैकी नऊ संस्थांना एक महिनाआड असे वर्षातले सहा महिने धान्य दिले जाते तर १० स्थानिक पातळीवरच्या संस्थांचे पालकत्व या संस्थेने घेतले आहे. नऊ संस्थांमध्ये सेवाश्रम, शांतीवन आणि श्रद्धा फाऊंडेशन या संस्थांसह माऊली मोखाडा, माऊली सिंधुदुर्ग, नगर येथील संकल्प संस्था आणि स्नेहप्रेम, पुणे येथील आजवळ, अमरावती येथील प्रश्नचिन्ह तर दहा संस्थांमध्ये समतोल, शबरी, सुहीत, घरकुल यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. १२ मैत्रिणींपासून सुरू केलेल्या या उपक्रमाशी आता १४३ गृहिणी जोडल्या गेल्या आहेत. ५० हजार किलो धान्य देण्याची ताकद आता या संस्थेची असल्याचे बागवाडे यांनी सांगितले. दर महिन्याला दाते मंडळी या संस्थेच्या ग्रीन बँकमध्ये आपले पैसे जमा करतात आणि संस्थांना ही मदत धान्यस्वरुपात केली जाते. दर वर्षाला १०० रुपये महिना प्रमाणे प्रत्येकी १२०० रुपये किंवा त्याहून अधिकही रुपये प्रत्येक कमवता हात आपली मदत देत असतात. आता हे कार्य इतर गावांतही पोहोचविण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.धान्यबँकेशी प्रत्येक गाव जोडले जाणारया उपक्रमात प्रत्येक गावातील गरजू संस्था निवडल्या जाणार आहेत. अन्नदानाची इच्छा असणाºया व्यक्ती या मोहिमेशी जोडल्या जातील आणि स्वत:बरोबर त्यांच्या नातेवाईक, मित्रमैत्रिणी जोडल्या जातील. परिणामी एका विचाराची सर्व मंडळी एकत्र येऊन प्रामाणिक काम करणाºया संस्थाच्या मागे शिधेच्या रुपाने उभ्या राहतील अशा प्रकारची ही संकल्पना आहे. यामुळे धान्यबँकेशी प्रत्येक गाव जोडण्यात येणार असल्याचा मानस बागवाडे यांनी व्यक्त केला आहे. अन्नदानाची इच्छा असणाºया व्यक्तींनी bagupb@gmail.com यावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. त्या माध्यमातून संस्थांना मदत केली जाणार आहे. यामुळे संस्था जबाबदार होतील, स्थानिक दानशूरांना मी माझ्या गावातील संस्थेला मदत केल्याचे समाधान मिळेल आणि त्यांना मदत करण्यासाठी हुरूप येईल.