शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या वाहनांवर ‘जीपीएस’

By admin | Updated: March 31, 2017 05:43 IST

केडीएमसीच्या ३१२ वाहनांमध्ये लवकरच जीपीएस प्रणाली बसवली जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला

कल्याण : केडीएमसीच्या ३१२ वाहनांमध्ये लवकरच जीपीएस प्रणाली बसवली जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आपल्या वाहनांवर वॉच ठेवता येईल. स्थायी समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या सभेत प्रशासनाकडून यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे. ही यंत्रणा बसवणे, त्याची देखभाल व दुरुस्तीसाठी एक कोटी ४२ लाख १७ हजार १०० रुपयांचा खर्च महापालिकेला येणार आहे.वाहनांवर ट्रेकींग सिस्टीम बसवण्यास २९ सप्टेंबर २०१६ च्या महासभेत मान्यता मिळाली आहे. यादृष्टीने महासभेपुढे सादर केलेल्या अर्थसंकल्पीय सादरीकरणात ई-गव्हर्नन्स अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन व वाहन विभागातील वाहने यांच्या महापालिका हद्दीत होणाऱ्या फेऱ्यांचे ट्रेकींग करण्यासाठी जीपीएस प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादृष्टीने मागवलेल्या निविदांमध्ये केपीएमजी अ‍ॅडव्हायझरी सर्विसेस प्राइव्हेट लि. या संस्थेची न्यूनतम दराची निविदा प्रशासनाकडून मान्य करण्यात आली आहे. वाहनांसाठी जीपीएस प्रणाली, रेडीओ फ्रिक्वे न्सी कार्यान्वित करणे आणि नोंदी ठेवणे, जीपीएस आणि रेडीओ फ्रिक्वेन्सीशी सांगड घालणारे जीपीएस बेस्ट अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार करून कार्यान्वित करणे, कार्यान्वित केल्यानंतर ३ वर्षांची देखभाल व दुरुस्ती करणे, वाहनांचे मार्ग, विविध कलेक्शन पॉइंट्स, वाहनांची वाहतूक इत्यादी बाबींचे व्यवस्थापन करणे, वाहनांची देखभाल, वाहनांवर व पार्किंग व डम्पिंग यार्डच्या गेटसवर रेडीओ फ्रिक्वेन्सीचा वापर करणे आदी कामे केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)