शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळेतील वर्ग वातानुकूलित; शिक्षक दाम्पत्याचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 06:13 IST

आदिवासी विद्यार्थी रमले शिक्षणात

वसंत पानसरे किन्हवली : शहापूर तालुक्यातील दुर्गम गाव असलेल्या वाऱ्याचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील एका वर्गात शिक्षक प्रमोदआणि शर्मिला पाटोळे यांनी स्वखर्चाने दोन वातानुकूलित यंत्रणा बसवल्या आहेत. जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की, गळके छप्पर, भिंतींना गेलेले तडे असे समीकरणच झाले आहे. परंतु, याला बगल देत संपूर्ण आदिवासी वस्ती असलेले गाव, सर्व पालक हे शेतकरी, कष्टकरी असून अशा पालकांच्या मुलांसाठी एका वर्गात वातानुकूलित यंत्र पाटोळे यांनी बसवले आहे.

आदिवासींच्या मुलांना चांगल्या शाळेचे वातावरण देण्यामागे हीच प्रमुख भावना आहे. वातानुकूलित वर्गात बसून मुले शिकत आहेत. कंटाळा न करता मुले दिवसभर छान अभ्यास करतात. संध्याकाळी घरी जाण्याची घाई न करता जास्त वेळ शाळेत बसून आपल्या ज्ञानात वाढ करत आहेत. लॅपटॉप, प्रोजेक्टर, अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलद्वारे शिकत आहेत. त्यामुळे नव्या ज्ञानाचा या ग्रामीण विद्यार्थ्यांना अतिशय सुयोग्य पद्धतीने परिचय होत आहे.

शाळेविषयी प्रेम, ओढ, जिव्हाळा विद्यार्थ्यांना वाटू लागला आहे. कुणालाही कंटाळा येत नाही. एकंदरीत वातानुकूलित वातावरणाचा आमच्या शाळेला शैक्षणिक बाबींसाठी उपयोग होत आहे. - प्रमोद पाटोळे, मुख्याध्यापक

आदिवासीपाड्यावरील मुलांना उत्तम दर्जाचे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात शिक्षक पाटोळे दाम्पत्य यशस्वी झाले आहे. विद्यार्थी अतिशय आनंदाने शाळेत जातात. दोन महिन्यांत या शिक्षकांनी शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. ठाणे जिल्ह्यातील एक हायटेक स्मार्ट शाळा आणि विद्यार्थी बनवण्याचा त्यांचा मानस आहे. - विठ्ठल शिवारे, ग्रामपंचायत सदस्य

टॅग्स :Schoolशाळा