शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणूक खर्चाला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:44 IST

यंत्रणेपुढे पेच : जिल्ह्याला मिळाला अवघा सव्वासोळा लाख रुपयांचा निधी 

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील ४३१ पैकी १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने सध्या उमेदवारी चिन्हेवाटपाचा टप्पा गाठला आहे. या निवडणूक खर्चाला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. आधीचा अनुभव लक्षात घेता प्रत्येक ग्रामपंचायतीला ४९ हजार रुपयांचा निधी प्रशासकीय खर्चासाठी मिळणे अपेक्षित होते. परंतु, तो यंदा प्रति ग्रा.पं. केवळ १० हजार ३०० रुपयेप्रमाणे ठाणे जिल्ह्यासाठी १६ लाख २७ हजार ४०० रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.       एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ग्रा.पं.च्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी १५ जानेवारीला मतदान  होणार आहे. याआधी प्राप्त निधीप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला निवडणुकीसाठी प्रशासकीय खर्च म्हणून ४९ हजार रुपयांचा निधी अपेक्षित होता. पण, प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी फक्त १६ लाख २७ हजार ४०० रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. 

७७ लाखांच्या निधीची होती अपेक्षायाआधी प्राप्त झालेल्या निधीप्रमाणे निवडणूक रिंगणातील १५८ ग्रामपंचायतींसाठी ७७ लाखांपेक्षा अधिक निधी मिळणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात १६ लाख २७ हजार ४०० रुपये मिळाले आहे. त्यातूनच या निवडणुकीचा खर्च भागवावा लागणार आहे. निधी दुसऱ्या टप्प्यात मिळणार किंवा नाही, असे काही मार्गदर्शन नसल्यामुळे या तुटपुंज्या निधीतून यंदाचा निवडणूक खर्च करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कशावर करावा लागणार प्रशासकीय खर्च?सध्या कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करावा लागणार आहे. मतदान साहित्य खरेदी, वाहनखर्च आहे. तसेच दोन ते तीन वेळा प्रशिक्षणाचे आयोजन करावे लागते. मतदार जनजागृतीसाठी होणारा खर्च आहे. मतदान केंद्रावरील खर्च. मतदान कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मानधनावरील खर्च आणि निवडणुकीच्या अनुषंगाने होणारा इतर खर्च आदींवर जिल्हा, तालुका व स्थानिक पातळीवर प्रशासकीय व कार्यालयीन खर्च करावा लागतो.

पहिल्या टप्प्यात प्रशासकीय कामे व कोरोनाच्या उपाययोजनांवरील खर्च या अत्यल्प प्राप्त निधीतून करावा लागणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यात कोरोनाच्या उपाययोजनांवरील वाढीव खर्च व प्रत्यक्ष निवडणुकीशी संबंधित खर्च हा प्राधान्यक्रमाने या निधीतून करावाच लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत