शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सुनील जोशी यांना गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 05:41 IST

अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती करणारे कल्याणचे सुनील जोशी यांना पुण्यातील बालगंधर्व नाट्य रसिक मंडळातर्फे देण्यात येणारा गोविंद बल्लाळ देवल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

कल्याण : आठ वर्षांपासून व्यावसायिक संगीत रंगभूमीवर अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती करणारे कल्याणचे सुनील जोशी यांना पुण्यातील बालगंधर्व नाट्य रसिक मंडळातर्फे देण्यात येणारा गोविंद बल्लाळ देवल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत नाटकातील उल्लेखनीय कामगिरीविषयी हा पुरस्कार जोशी यांना देण्यात आला आहे.पुण्यातील बालगंधर्व नाट्य रसिक मंडळ ४२ वर्षांपासून कार्यरत आहे. या मंडळाकडून हा पुरस्कार जोशी यांना दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रोख रुपये, शाल श्रीफळ आणि मानचिन्ह असे आहे. १४ जुलैला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात जोशी यांना प्रदान केला जाणार आहे.जोशी हे कल्याणमध्ये राहतात. नाटकाची आवड त्यांना शालेय जीवनापासूनच असल्याने १९९६ पासून ते हौशी नाट्यकलाकार म्हणून नाटकात काम करत होते. २०११ सालापासून ते व्यावसायिक संगीत नाटकात काम करत आहेत.आतापर्यंत जोशी यांनी संगीत जयजय गौरीशंकर, कान्होपात्रा, सौभद्र, संत गोराकुंभार, संन्यस्त खड्ग, देवमाणूस, कुलवधू, स्वयंवर, संत ज्ञानेश्वर या नाटकात भूमिका, निर्मिती आणि दिग्दर्शनाचे काम केले आहे.जोशी यांना यापूर्वी स्वरबहार विश्वनाथ बागुल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा काकासाहेब खाडिलकर या दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. गोविंद बल्लाळ देवल हा त्यांचा तिसरा पुरस्कार आहे. त्यांनी पुरस्कारात हॅट्ट्रिक केली आहे.>संगीत नाट्यभूमी दुर्लक्षित झाली होती. तिच्याकडे रसिकांनी पाठ फिरवली होती. पुन्हा तिला चांगले दिवस आणून देण्यासाठी २०११ पासून ही नाटके केली. या नाटकात तरुण कलाकारांनी काम करावे, असा आग्रह धरला. संगीत नाटकातील जुन्या धक्का न पोहोचवता. तसेच तीन तासांत ही नाटके बसवली. रसिकाला कंटाळवाणे वाटणार नाही, अशी त्याची मांडणी केली. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे मी केलेल्या कामाला मिळालेली पावती आहे, असे मला वाटते. पुरस्कार मिळाल्याने मला व माझ्या टीमला खूप आनंद झाला आहे. पुरस्काराने माझ्यावरची जबाबदारीही वाढली आहे.- सुनील जोशी