शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचा हक्क हिसकावण्याचा सरकारचा डाव; वंचितचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

भिवंडी - राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने या पाच जिल्ह्यांतील ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातील जागा ...

भिवंडी - राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने या पाच जिल्ह्यांतील ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातील जागा रद्द केल्यामुळे ५ जिल्ह्यांत ओबीसींच्या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. असे असताना महाराष्ट्र सरकारने जो अध्यादेश काढला आहे, तो म्हणजे ओबीसींची दिशाभूल करण्याचे षडयंत्र असल्याचे मत ठाणे जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत मांडले व राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला.

आम्ही ५० % च्या अधीन राहून ओबीसींच्या आरक्षणाचा अध्यादेश काढू, असे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले. मात्र, अध्यादेश काढणे म्हणजे ओबीसींची मते मिळविण्यासाठी चाललेले नाटक आहे. मराठा आरक्षणाची जशी सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप या पक्षांनी वाट लावली, त्याचप्रमाणे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची वाट लावण्याचे राजकारण सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप खेळत आहेत. या फसवणुकीच्या षडयंत्रापासून ओबीसींनी सावध राहावे, असे सुनील भगत म्हणाले.

तसेच ठाणे-भिवंडी रस्त्यावर एमएमआरडीएमार्फत मेट्रोचे काम चालू आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असूनही टोलवसुली केली जाते. त्यामुळे ती वसुली बंद करण्यात यावी, अशी मागणी भगत यांनी केली. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ २४ सप्टेंबर रोजी कशेळी टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.