शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटी झाडे लागवडीचा शासनाचा उपक्रम

By admin | Updated: April 22, 2016 02:05 IST

महाराष्ट्रावर गेली चार वर्षे पडलेले दुष्काळाचे सावट, जागतिक तापमान वाढीने घटलेले पर्जन्यमान, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट व कोसळणारे हिमकडे, नद्यांची सुकलेली पात्रे, धरणांनी गाठलेला तळ

दत्ता म्हात्रे,  पेणमहाराष्ट्रावर गेली चार वर्षे पडलेले दुष्काळाचे सावट, जागतिक तापमान वाढीने घटलेले पर्जन्यमान, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट व कोसळणारे हिमकडे, नद्यांची सुकलेली पात्रे, धरणांनी गाठलेला तळ या सर्व मानवनिर्मित हस्तक्षेपाचा फटका, निसर्गचक्रात केलेला वारंवार बदल याची फार मोठी किंमत मानवी समाजासह जीवसृष्टीला भोगावी लागली आहे. याच संकटाचा धडा घेत राज्य शासनाने २०१६-१७ या वर्षात सबंध राज्यभरात हिरव्या गालिच्यांचा संकल्प केला आहे. तब्बल २ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ३१ मेपर्यंत वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे आदेशच सामाजिक वनीकरण व वनविभागाला दिले आहेत.पृथ्वीच्या घटकामध्ये, भूमी, जल, वायू, आकाश व प्रकाश (तेज) या नैसर्गिक संजीवक घटकांची शुध्दता व सजीव सृष्टीचे रक्षण करणे ही मानवी समाजाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या तत्वानुसारच भविष्यात मार्गक्रमणा करावी लागणार आहे. शासकीय यंत्रणेबरोबर स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, खासगी उद्योजक, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून वृक्ष लागवड करण्याचा शासनाचा निर्धार आहे.यावर्षीचा पाऊस १०६ टक्के पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन कार्यक्रम जाहीर झाला आहे. वृक्षमहोत्सव काळात १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शासनाने संकल्प केलेल्या २ कोटी वृक्षलागवडीपैकी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व वनविकास महामंडळ यांनी १ कोटी ५० लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट्य दिले आहे.