शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गरजूच्या हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन कटिबध्द- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By जितेंद्र कालेकर | Updated: November 27, 2023 21:27 IST

झोपडपट्टी मुक्त शहरासाठी जलद गतीने प्रकल्प मंजूर करणार: ४०० कुटूंबीयांना मिळाली एसआरए प्रकल्पातील हक्काची घरे

ठाणे: झोपडपट्टी पुनर्विकास योजनेबरोबरच क्लस्टरलाही चालना दिली. त्यामुळे झोपडपट्टी मुक्त शहरासाठी जलद गतीने प्रकल्पांना मंजूरी दिली जात आहे. चांगल्या दर्जाचे स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न आज ४०० कुटूंबीयांचे पूर्ण होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते ४० लाख गरिबांना घरे देणे, त्यातून एसआरए योजना सुरू झाली. याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले.

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत अंतिम भूखंड क्रमांक ३७७ मौजे पाचपाखाडी, चंदनवाडी, पाठक इस्टेट, ठाणे श्री.जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथील झोपडपट्टी लाभार्थ्यांकरिता ४०० सदनिका आणि १०० गाळयांच्या चाव्याच्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआर) चे ठाणे कार्यालय स्वतंत्र केल्याने ठाण्यातील गरजूंना लवकर घरे मिळतील. संपूर्ण एमएमआर क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना सुरू केली. शासनाने लोकांच्या हितासाठी या योजनेतील काही नियमांमध्ये बदल केले.शासनाची महत्वाकांक्षी क्लस्टर योजना ठाण्यात सुरू केली. दहा हजार घरांच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करीत आहोत. नियम-कायदे लोकांच्या भल्यासाठी हवेत, हे शासन त्यासाठीच काम करीत आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या प्रकल्पात ४०० घरे आणि १०० दुकानांसह व्यायामशाळा, बालवाडी, ग्रंथालय अशा विविध सुविधाही आहेत. या उत्तम दर्जाच्या सुविधांसह उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची निगा राहणे, परिसर स्वच्छ ठेवणे, ही सर्वांची जबाबदारी आहे.

वातावरण चांगले ठेवले की सर्वच चांगले होते. समरीन ग्रुप ने वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पाचे विकासक मुश्ताक शेख यांचे अभिनंदन करुन मुंबई-ठाणे शहरातील रखडलेल्या इतर प्रकल्पांचेही काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. शेवटी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री. जगन्नाथ या संस्थेच्या सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकेच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे