शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे दुर्लक्ष : जीएसटीच्या जाळ्यात मच्छीमारांची तडफड , निर्यात, घाऊक पुरवठ्याचे दर कोसळल्याचा बसलाय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:11 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जीएसटी लागू केल्याचा मच्छीमारांना चांगलाच फटका बसला आहे. निर्यात होणाºया मासळीसह घाऊक विक्री

राजू काळे भार्इंदर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जीएसटी लागू केल्याचा मच्छीमारांना चांगलाच फटका बसला आहे. निर्यात होणाºया मासळीसह घाऊक विक्री होणाºया मासळीचा दर प्रतिकिलोमागे सुमारे ३०० रुपयांपर्यंत कोसळल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.अगोदर विक्रीकर व व्हॅटमधून मच्छीमारांना सवलत मिळत होती. ती जीएसटी लागू झाल्यावर मिळेनाशी झाली. पूर्वीच्या करापेक्षा जीएसटीची टक्केवारी अधिक असल्याने मच्छीमारांच्या तोंडचे पाणीच पळाले. पूर्वीच्या करआकारणीत मासळी निर्यात व घाऊक विक्री करणाºया मच्छीमारांना मासळीचा चांगला दर मिळत होता. जीएसटी लागू झाल्यावर माशांच्या खरेदीदारांत घट झाल्याने मच्छीमारांना हा नाशिवंत माल कमी दराने विकावा लागत आहे.शेतीप्रमाणेच मासेमारीला कृषी व्यवसायाचा दर्जा आहे. त्यामुळे शेतीप्रमाणेच मासेमारीला सवलत मिळावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. मासळीला तर शेतीप्रमाणे हमीभाव मिळत नसल्याने व्यापाºयांकडून त्यांची पिळवणूक होते. मच्छीमार संघटनांकडून सरकारकडे सतत या मागण्या होत असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा मच्छीमारांचा आरोप आहे. परदेशात विक्री होणाºया मासळीला मिळणारा दर हा परकीय चलनाच्या दरातील चढउताराप्रमाणे निश्चित होतो. तो मच्छीमारांना न मिळता व्यापारीच खिशात घालतात. कमी दरात मच्छीमारांची बोळवण केली जाते. एमपीडीए (मरीन प्रॉडक्ट्सडेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी) या सरकारी संस्थेकडूनही मच्छीमारांच्या पिळवणुकीकडे दुर्लक्ष होत असून निर्यातदारांचेच हित जोपासत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला. यामुळे मच्छीमारांत तीव्र नाराजी आहे. अगोदर मासेमारीची नेमकी नोंद सरकारी यंत्रणेकडून होत होती. ती सध्या होत नसल्याने त्याची जबाबदारी मच्छीमार संस्थांच्या शिरावर आली आहे. अगोदर कराच्या कक्षेत नसलेल्या मच्छीमारांना कराच्या जाळ्यात खेचल्याने घाऊक मासळी विक्रेत्यांनाही कागदपत्रांचे सोपस्कार पार पाडावे लागतात. हिशेबाची नोंद ठेवण्यासंबंधी मच्छीमारांत संभ्रम आहे. मोठ्या खरेदीदारांकडून जीएसटी लागू केल्यानंतर मच्छीमारांना अपेक्षित दर दिला जात नाही. पूर्वी निर्यात होणाºया एक नंबरच्या पापलेटचा दर १३५० रुपये, दोन नंबरच्या पापलेटचा दर ११५० रुपये व तीन नंबरच्या पापलेटचा दर ८५० रुपये प्रतिकिलो होता. आता किलोमागे २५० ते ३०० रुपये कमी दर मिळू लागला आहे. याखेरीज, मच्छीमारांना मासेमारी बोट बांधण्यासाठी लागणारे साहित्य संस्थेकडून अगोदर सवलतीच्या दरात उपलब्ध होत होते. त्या साहित्यावरही यंदा जीएसटी लागू झाल्याने एका मासेमारी बोटीचा आता २२ ते २७ लाखांच्या घरात गेला आहे.

टॅग्स :GSTजीएसटी