शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या जमिनीवर सरकारी अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 04:22 IST

नजरकैदेत ठेवल्याचा कुटुंबाचा आरोप : पोलीस बळाचा वापर करून केले बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : तालुक्यातील मोरोशी येथील शेतकरी मधुकर कुशा पारधी आणि इतरांच्या सामायिक मालकीच्या जमिनीवर बांधकाम विभागाने पोलिसी बळाचा वापर करून आठ एकर जमिनीपैकी दोन एकरवर पंचवीस लाख खर्चून संरक्षण भिंतीचे बांधकाम केले आहे. मात्र, या कुटुंबाने कामाला विरोध केला असता संपूर्ण कुटुंबाला बांधकाम पूर्ण होईतो तीन महिने टोकावडे पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा खळबळजनक आरोप त्या कुटुंबाने केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी ‘त्यांच्या थोड्या जागेत’ बांधकाम झाल्याचे मान्य करून त्यांना पर्यायी जागा देण्यास तयार आहोत, असे स्पष्ट केले; तर त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने पोलीस ठाण्यात आणल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ती जागा त्यांची नसल्याचा दावाही पोलिसांनी केला. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे दाद मागितली असून न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा दिला आहे.कल्याण-नगर महामार्गालगत मोरोशी गाव असून, येथे पंचवीस ते तीस वाड्या-पाडे आहेत. तसेच दहा ते बारा हजार लोकसंख्या आहे. या लोकांना आरोग्यसेवा मिळावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले.मात्र, जागेअभावी नवीन इमारतीचे बांधकाम रखडले होते. यासाठी बांधकाम विभागाने सरकारी जागेचा पर्याय निवडला. परंतु, ज्या जागेवर गाव वसले आहे तीच जागा कागदोपत्री बांधकाम (जि.प.) विभागाला दवाखाना बांधण्यासाठी देण्यात आली. बांधकाम विभागाने या जागेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी २५ लाख मंजूर केले. कामाला सुरुवात करण्यात आली, ती जागा मधुकर कुशा पारधी यांची असल्याने त्यांनी या बांधकामास विरोध केला. मात्र, बांधकाम विभागाने पोलिसांना हाताशी धरु न पारधी यांच्या संपूर्ण कुटुंबाला तीन महिने नजरकैदेत ठेवले होते.पारधी यांच्या जमिनीचा सर्व्हे नंबर २१/२ असून ही जमीन त्यांच्या वडिलांनी ४० वर्षांपूर्वी विकत घेतली आहे. आज या जमिनीत हे कुटुंब भाताचे पीक घेते. तर सरकारी जमिनीचा सर्व्हे नंबर २/६ असा असून ही जागा दोन एकर आहे. या जागेवर सगळे गाव वसले आहे.पारधी यांनी दोन वेळा सरकारी मोजणी केली तेव्हा त्यांना योग्य हद्द दाखवण्यात आली. परंतु, दवाखान्याच्या बांधकामासाठी बांधकाम विभागाने मोजणी केली, तेव्हा पारधी यांच्या जागेत चुकीचे निशाण दाखवण्यात आले. पुन्हा पारधी यांनी मोजणीसाठी अर्ज केला, तेव्हा मोजणी अधिकारी पांढरे यांनी जागेची मोजणी न करताच ती झाल्याचे दाखवत पारधी यांच्याकडे संमती मागितली.आपल्या जागेवर बांधकाम विभाग, भूमिअभिलेख आणि आरोग्य विभागाने संगनमत करून दवाखान्यासाठी अतिक्रमण केल्याने तसेच त्यांना वारंवार पोलिसांकडून त्रास दिल्याने हे कुटुंब भयभीत झाले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण