शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्याने पोलीस मित्रावर झाडली गोळी,दोन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:09 IST

भिवंडी : शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याने आपल्या कडील गावठी बनावटीच्या रिव्हॉल्वरने पोलीस मित्राच्या घरांत शिरून त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या.परंतू झटापटीत ...

ठळक मुद्देशासकीय कर्मचा-याने केला पोलीस मित्रावर गोळीबारपुर्व वैमन्यस्यातून घरात घुसून गोळीबारदोन्ही मित्र जळगावात एकाच परिसरांतील रहाणारे

भिवंडी : शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याने आपल्या कडील गावठी बनावटीच्या रिव्हॉल्वरने पोलीस मित्राच्या घरांत शिरून त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या.परंतू झटापटीत नेम चुकल्याने त्याच रिव्हाल्वरच्या लोखंडी दस्त्याने पोलीसाच्या डोक्यावर प्रहार केल्याने पोलीस जखमी झाला आहे.तर आरोपीला पकडण्यास गेलेल्या शेजा-याच्या डोक्यावर दस्त्याने प्रहार केल्याने एकुण दोघेजण जखमी झाले आहेत. गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या आरोपी चंद्रकांत बाविस्कर यास शेजाऱ्यांच्या मदतीने पकडल्याने त्यास नारपोली पोलिसांनी त्यास अटक केली आहे.नितीन सपकाळे (४०) असे जखमी पोलिसाचे नाव असून तो ठाणे शहर पोलीसमधील वाघाबिळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तर चंद्रकांत बाविस्कर (३६) हे वांद्रे येथील शासकीय कार्यालयात मराठी अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. ते दोघेही मूळचे जळगाव जिल्ह्यातील एकाच परिसरातील असल्याने पूर्वी पासून मित्र आहेत. नितीन सपकाळे हे कशेळी गावात रहात आहेत तर चंद्रकांत बावीस्कर हे जवळच काल्हेर गावात रहात आहेत. त्यामुळे त्यांचे दोघांचे कौटुंबिक संबंध प्रस्थापीत झाले होते. मात्र पुर्व वैमन्यस्यातून चंद्रकांत बाविस्कर याने आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास कशेळी येथील श्री सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये नितीन सपकाळे याच्या घरात घुसून त्याच्यावर गावठी रिव्हाल्वरने गोळीबार केला. परंतु गोळी चुकविल्याने ती समोरील भिंतीत रूतून बसली. त्यामुळे संतापलेल्या बावीस्कर याने नितीन सपकाळे याच्या अंगावर धावत जाऊन त्याच्याशी झटापटी केली आणि सकपाळे याच्या डोक्यात रिव्हॉल्वरचा दस्ता मारला. त्यामुळे सपकाळे हे जखमी झाले. इमारतीत झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने सकपाळेच्या शेजारील अभिषेक यादव याने धावत जाऊन चंद्रकांत बावीस्कर यास पकडले. त्यामुळे बावीस्कर याची यादव बरोबर झटापट झाली. या झटापटीत बावीस्कर याने यादवच्या देखील डोक्यावर रिव्हॉल्वरचा लोखंडी दस्ता मारल्याने त्यास दुखापत झाली आहे. दरम्यान परिसरांतील लोकांनी जखमी पोलीस नितीन सकपाळे यास ताबडतोब काल्हेर येथील खाजगी रूग्णालयांत उपचाराकरीता दाखल केले. या प्रकरणी माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी चंद्रकांत बाविस्कर यास अटक करून त्याच्याकडून दोन गावठी बनावटीच्या रिव्हॉल्वरसह ताब्यात घेतले. या घटनेप्रकरणी बावीस्कर याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीFiringगोळीबार