शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या निधीचा घोळ सुरुच, योग्य वापराचा सरकारचा दावा : मात्र निधी अन्यत्र वापरल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:49 IST

केडीएमसीने दिव्यांग पुनर्वसन अंतर्गत तरतूद केलेल्या निधीचा वापर योग्य प्रकारे केला असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी

कल्याण : केडीएमसीने दिव्यांग पुनर्वसन अंतर्गत तरतूद केलेल्या निधीचा वापर योग्य प्रकारे केला असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हा खुलासा केला आहे. दरम्यान, केडीएमसीने राज्य सरकारची दिशाभूल केली असल्याचा आरोप दिव्यांगांच्या समस्यांना वाचा फोडणारे दत्तात्रेय सांगळे यांनी केला आहे.दिव्यांगांच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान तीन टक्के निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांवर खर्च करावा, असे बंधन सरकारने घातले आहे. परंतु, त्याकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाल्याचे डोंबिवलीतील दिव्यांग सांगळे यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकारात हे वास्तव उघड झाले. दिव्यांगांसाठी राखीव असलेला निधी अन्य कामांसाठी वापरल्याचा आरोप सांगळे यांचा आहे.दरम्यान, हा निधी कोणकोणत्या कामांसाठी वापरला, याची तपशीलवार माहिती आमदार शिंदे यांनी महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडे मागितली होती. तसेच याबाबतचा मुद्दा त्यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित केला होता. शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्य सरकारचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी नुकताच खुलासा करत संबंधित तरतूद केलेल्या निधीचा विनियोग दिव्यांगांकरिताच केल्याचा दावा केला आहे. केडीएमसीने सरकारला दिलेल्या अहवालानुसार २०१० ते २०१५ दरम्यान ६१ लाख ४६ हजार ३२६ रुपयांचा निधी दिव्यांगांकरिता खर्च झाल्याचे राज्यमंत्री पाटील यांनी शिंदे यांना पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे.केडीएमसीकडून राज्य सरकारची दिशाभूल : संजयनगर परिसरात अंध दिव्यांगांची संख्या ५० टक्के आहे, याला दिव्यांग दत्तात्रेय सांगळे यांनी आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारची केडीएमसीने दिशाभूल केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच खर्च झालेल्या निधीबाबत राज्यमंत्र्यांनी केलेला खुलासा पाहता त्यांना दिशााभूल करणारी माहिती पुरवली गेल्याचा सांगळे यांचा आरोप आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या तपशिलात हा खर्च झालेल्या निधीचा तपशील का दिलेला नाही, असा सवाल त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडणार : शिंदेतरतूद केलेला निधी हा दिव्यांगांसाठीच वापरला असून त्यात दिव्यांगांची कोणत्याही प्रकारे अवहेलना झालेली नसल्याने याबाबत चौकशी करण्याचा तसेच संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण राज्यमंत्री पाटील यांनी दिले असले तरी दिव्यांगांच्या भावना लक्षात घेता निधीच्या खर्चाचा मुद्दा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडणारअसल्याचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका