शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या भीमसेन जोशी रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका , कर्मचाऱ्यांना ३ महिने पगार नाही

By धीरज परब | Updated: July 2, 2023 00:26 IST

परिचारिका व कर्मचारी कामावर न आल्याने सेवा विस्कळीत

मीरारोड - राज्य शासनाच्या भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका व कर्मचाऱ्यांना तब्बल ३ महिन्यांचा पगार मिळालेला  नाही . त्यातच शुक्रवार पासून अनेक परिचारिका , कर्मचारी कामावर न आल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे . कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ह्या अघोषित बंद ला आरोग्य विभागचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून कंत्राट मार्च मध्ये संपलेले असताना त्याला अजून मुदतवाढ दिलेली नाही . 

भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात  मोठ्या संख्येने गरीब , गरजू रुग्ण उपचारासाठी येत असतात . रुग्णालयात परिचारिका ,  वॉर्ड बॉय , तंत्रज्ञ, शिपाई , वाहन चालक आदी सुमारे १४० कंत्राटी कर्मचारी आहेत .  फोकस फॅसिलिटी ह्या ठेकेदार मार्फत कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले असून त्याचे कंत्राट मार्च २०२३ मध्येच संपलेले आहे .  शासनाच्या आरोग्य विभागा कडून ठेकेदारास मुदतवाढ मंजूर करण्यासह  कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काम करून देखील एप्रिल , मे , जुन ह्या तीन महिन्याचा पगार काढलेला नाही . त्यामुळे कर्मचारी देखील तीन महिन्या पासून पगारा विना काम करत आहेत . 

 घरचा खर्च चालवणे अवघड झाले असतानाच मुलांच्या जून मध्ये सुरु झालेल्या शाळा - शिक्षणाचा खर्च आदी भागवणे ह्या बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने त्रासदायक झाले आहे . लांबून येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना तर प्रवासाचा खर्च सुद्धा जमत नाही . परंतु नोकरी जाऊ नये म्हणून पोटाला चिमटा काढून हे कंत्राटी कर्मचारी काम करत आले . 

मात्र शुक्रवार पासून अनेक परिचारिका व कर्मचारी हे कामावर आलेच नाहीत . त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली आहे . जेणे करून रुग्णांचे हाल होत आहेत . कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे . 

श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी सांगितले कि , ठेकेदारास मुदतवाढ व कंत्राटी कामगारांना वेळेत पगार देण्या बाबत आपण ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांना लेखी पत्र देऊन चर्चा देखील केली . परंतु कंत्राटी कर्मचारी आदींचे पगार दोन - तीन महिने राखडवणे हे नेहमीचे झाले असून या प्रकरणी वेळीच कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा व कमर्चाऱ्यांना वेळेत पगार द्या अशी मागणी केली आहे .