शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कळव्याच्या सी लिंकला अखेर शासनाची मान्यता

By admin | Updated: July 8, 2015 00:19 IST

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या सागरी सेतूला (सी लिंकला) अखेर राज्य शासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे.

ठाणे : मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या सागरी सेतूला (सी लिंकला) अखेर राज्य शासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे या खाडीवर तिसरा आणि अतिशय महत्त्वांकाक्षी प्रकल्प येत्या काळात मार्गी लागणार आहे. या सेतूसाठी १८३ कोटींचा खर्च अपेक्षित धरला असून त्याचे डिझाईनदेखील अंतिम झाले आहे. येत्या दोन महिन्यात त्याचे काम प्रत्यक्षात सुरु होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे. ठाण्याकडून बेलापूर आणि खारेगावकडे जाणारी वाहतूककोंडी या सेतूमुळे फुटणार असून एकेरी वाहतूक या पुलावरुन केली जाणार आहे. तर ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी जुन्या पुलावरुन एकेरी वाहतूक होणार असून ब्रिटीशकालीन पूल हा पादचाऱ्यांसाठीच राखीव ठेवला जाणार आहे. विशेष म्हणजे नव्या सेतूवर सुद्धा पादचाऱ्यांसाठी मार्गिका उभारण्यात येणार आहे.विटावा पुलाखालील आणि खारेगावकडे जाणारी वाहतूककोंडी सुटावी यासाठी या सेतूचा प्रस्ताव पालिकेने २०११ मध्ये पुढे आणला. सध्या कळवा खाडीवर एक ब्रिटीशकालीन आणि एक पालिकेने बांधलेला पूल आहे. परंतु, ब्रिटीशकालीन पुलाची अवस्था दयनीय झाल्याने सध्या तो केवळ पादचाऱ्यांसाठी आणि दुचाकीसाठीच खुला ठेवला आहे. त्यामुळे नव्या पुलावर वाहतूककोंडी होतांना दिसते. त्यामुळेच पालिकेने या नव्या सागरी सेतूची संकल्पना पुढे आणली. त्यानुसार २०११ च्या अंदाजपत्रकात १० कोटींची तरतूद केली होती. तसेच २०१२ मध्ये महासभेनेदेखील त्याला मंजूरी दिली. सुरुवातीला सादर केलेल्या प्रस्तावात काहीसे बदल तत्कालीन आयुक्तांनी सुचविल्यानंतर पुन्हा या प्रकल्पावर काम सुरु झाले. परंतु, मेरीटाईम बोर्ड आणि इतर परवानग्या घेण्यात काहीसा विलंब झाल्याने या प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले होते. दरम्यान आता मागील आठवड्यात राज्य शासनाकडे झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने आता येत्या दोन महिन्यात त्याला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे. जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर म्हणजे हायटाईडपेक्षा सुमारे १२ मीटर उंचीवर हा सागरी सेतू उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच बेलापूर दिशेला अशा दोन्ही मार्गाने तो खाली उतरणार आहे.