शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

सरकारच्या आंतरजातीय विवाह योजनेला ठाण्यात चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:34 IST

५० हजार अनुदान : तीन वर्षांत २८० जोडप्यांना आर्थिक साहाय्य

n  स्नेहा पावसकर     लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य व केंद्र शासनाच्या आंतरजातीय विवाह योजनेला ठाणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत विवाहित जोडप्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील २८० जोडप्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला असून यंदाही कोरोनाचा प्रसार असला तरी सुमारे २०० नवे प्रस्ताव यासाठी आलेले आहेत.आंतरजातीय विवाह म्हटले की त्याला घरातून, समाजातून काही प्रमाणात का असेना विरोध होतो. पण जातीयता नष्ट करण्यासाठी ही योजना प्रोत्साहक ठरत आहे. या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागात अर्ज केल्यास प्रत्येक जोडप्यास ५० हजार इतके अनुदान दिले जाते, परंतु शासनाकडून येणारे हे अनुदान दोन वर्षांपूर्वी रखडले होते. मात्र पाठपुरावा केल्यावर ते अनुदान मिळाले.

पाठपुराव्यानेच मिळवले शासनाकडून अनुदानयोजनेला आता चांगला प्रतिसाद  मिळतो आहे. दोन वर्षांपूर्वी येणारे आर्थिक सहाय्य शासनाकडूनच मिळत नव्हते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून ते अनुदान मिळाले व रखडलेले प्रस्ताव मार्गी लागले. 1    - रमेश अवचार,     जिल्हा समाज कल्याण अधिकारी,ठाणे.

याेजनेचा लाभ कोणाला?आंतरजातीय विवाह करणाऱ्या विवाहित जोडप्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. या जोडप्यापैकी एक व्यक्ती सवर्ण व एक मागासवर्गीय असणे आवश्यक आहे. त्यांनाच आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेच्या सवलती मिळतात. ही योजना अ.जा, अ.ज, वि.ज, भ.ज या आंतरप्रवर्गातील आंतरजातीयांना लागू होते. या जोडप्याला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.