शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
6
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
7
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
8
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
9
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
10
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
11
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
12
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
13
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
14
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
15
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
16
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
17
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
18
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
19
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
20
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी: पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार!

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 8, 2024 15:16 IST

गेल्या वर्षी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती. त्यामुळे यावर्षी बाप्पा १२ दिवस लवकर आले. 

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क |ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करीत दीड दिवसांच्या गणरायाला रविवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. पण पुढच्या वर्षी खरोखरच बाप्पा लवकर येणार आहेत. २०२५ साली बाप्पा ११ दिवस लवकर येणार आहेत. पुढील वर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवार २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले. 

वाजत गाजत शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. संपूर्ण शहरातील वातावरण भक्तीमय झाले आहे. यावर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सहाव्या दिवशी होत आहे. यावषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, पुढच्या वर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी होणार आहे. मंगळवार २ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. तसेच अनंत चतुर्दशी अकराव्या दिवशी शनिवार ६ सप्टेंबर २०२५ रोजी येणार आहे. गेल्या वर्षी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती. त्यामुळे यावर्षी बाप्पा १२ दिवस लवकर आले. 

सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील एकरा वर्षातील श्रीगणेश चतुर्थीचे दिवस१) बुधवार २७ ऑगस्ट २०२५२) सोमवार १४ सप्टेंबर २०२६३) शनिवार ४ सप्टेंबर २०२७४) बुधवार २३ ऑगस्ट २०२८५) मंगळवार 11 सप्टेंबर 2029६) रविवार १ सप्टेंबर २०३०७) शनिवार २० सप्टेंबर २०३१८) बुधवार ८ सप्टेंबर २०३२९) रविवार २८ ऑगस्ट २०३३१०) शनिवार १६ सप्टेंबर २०३४११) बुधवार ५ सप्टेंबर २०३५

टॅग्स :Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024