शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

‘गोंगाटा’मुळे वाचला बिबट्याचा जीव; अन्नपाण्याविना झाडाझुडपात होता पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 06:22 IST

बदलापूरजवळील घटना: रविवारी रात्री गोरेगावच्या एका फार्म हाऊसवर जाणाऱ्या कुटुंबाने प्लास्टिकच्या भांड्यात तोंड अडकल्याने संकटात सापडून सैरभैर झालेल्या बिबट्याच्या बछड्याला पाहिले होते.

 पंकज पाटीलबदलापूर : बदलापूरच्या गोरेगावच्या जंगलात कालपासून शंभरेक लोक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह थाळ्या वाजवत, आरडाओरडा करीत फिरत होते. गेल्या चार दिवसांपासून पाण्याच्या प्लास्टिकच्या भांड्यात तोंड अडकल्यामुळे अन्नपाण्यावाचून झाडा-झुडपात निपचीत पडलेल्या बिबट्याचा जीव वाचवण्याकरिता ही मोहीम सुरू होती. आवाजामुळे बिबट्या झुडपातून बाहेर आला तरच त्याला वाचवणे शक्य होते. अखेर मंगळवारी सायंकाळी ही मोहीम यशस्वी झाली आणि बिबट्याच्या गळ्यात अडलेला प्लास्टिक जार काढून त्याला वाचवण्यात आले.

रविवारी रात्री गोरेगावच्या एका फार्म हाऊसवर जाणाऱ्या कुटुंबाने प्लास्टिकच्या भांड्यात तोंड अडकल्याने संकटात सापडून सैरभैर झालेल्या बिबट्याच्या बछड्याला पाहिले होते. या घटनेची माहिती वन विभागाला दिली. सोमवारी सायंकाळपर्यंत वन विभागाचे कर्मचारी आणि प्राणीमित्र प्रयत्न करीत होते. सोमवारी रात्री ही शोधमोहीम सुरू होती; मात्र बिबट्या कुठेच न आढळल्याने तो कुठल्यातरी झुडपात असेल, अशी शक्यता होती. मंगळवारी सकाळपासून पथकाने बिबट्याचा शोध सुरू केला. त्याला झुडपातून बाहेर काढण्यासाठी आरडाओरडा करून आणि गोंगाट भरला जात होता.  त्याला अखेर यश आले. लागलीच त्याच्या गळ्यातून प्लास्टिकचा जार काढला. 

टॅग्स :leopardबिबट्या