शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

घोलवडला सुरू झाली मिडी

By admin | Updated: December 9, 2015 00:35 IST

घोलवड गावात रस्त्याला भगदाड पडल्यामुळे पंधरा दिवस एस.टी सेवा बंद होती. तथापी डहाणूहून चिखलेमार्गे बोर्डी येथील शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते.

बोर्डी : घोलवड गावात रस्त्याला भगदाड पडल्यामुळे पंधरा दिवस एस.टी सेवा बंद होती. तथापी डहाणूहून चिखलेमार्गे बोर्डी येथील शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते. ते दूर करण्याची मागणी लोकमतच्या माध्यमातून नागरीकांनी केली होती. त्यानुसार मंगळवार दि. ८ डिसेंबर पासून मिडी बस सेवेला प्रारंभ झाल्याने विद्यार्थी व प्रवाशांनी आनंद व्यक्त करून लोकमतचे आभार मानले आहेत.घोलवड गावातील रस्त्याला भगदाड पडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साधी बस प्रवासी वाहतुक डहाण्ूा बस आगाराने पंधरा दिवसापासून बंद केली. त्यामुळे या बसेस आगर, कॉरेज हॉस्पिटल, नरपड, साईबाबा, खाडीपाडा, चिखले, वडकतीपाडा, टोकेपाडा इ. बस थांब्यावरील प्रवाशांना घेउन घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जात होत्या. तथापी बोर्डीतील शाळा-महाविद्यालयापर्यंत पोहचण्याकरीता शेकडो विद्यार्थ्यांना चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. थकल्यामुळे अभ्यासाप्रमाणेच आरोग्यावर परिणाम जाणवत होता. तर काही विद्यार्थी शाळा बुडवत असल्याचे पालकांचे म्हणणे होते. बोर्डीत विद्यार्थ्यांची पायपीट या वृत्ताद्वारे घोलवड प्राथमिक केंद्र शाळेसमोरील पर्यायी मार्गावर मिडी बस सेवा सुरू करण्याची सूचना लोकमतच्या वृत्तामधून करण्यात आली होती. डहाणू प्रांत अधिकारी अंजली भोसले यांनी बातमीची दखल घेत डहाणू बस आगार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना केली होती. चिखले व घोलवड महात्मा गांधी तंटामुक्त समितीने बातमीचा दाखला देवून संबंधीत विभागाशी संपर्क साधला होता.दरम्यान डहाणू बस आगाराने तत्काळ पाहणी करून मिडी बसेस सुरू करण्याला हिरवा कंदील दाखवला असून प्रतिदिन दहा फेऱ्या मंगळवार दि. ८ डिसेंबर पासून सुरू केल्या आहेत. लोकमतच्या वृत्ताने मिडी बस सेवा सुरू झाल्याने विद्यार्थी, पालक व प्रवाशांनी आनंद व्यक्त करून आभार मानले आहेत.