शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

टीडीआर प्रकरणी सोनवणेंची चौकशी

By admin | Updated: November 25, 2015 01:44 IST

कल्याणमधील मौजे चिकणघर येथील ७३ हजार चौरस मीटरच्या विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) घोटाळ्याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे

डोंबिवली : कल्याणमधील मौजे चिकणघर येथील ७३ हजार चौरस मीटरच्या विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) घोटाळ्याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले आहेत.नगरविकास विभागाने शुक्रवारी पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना पाठविलेल्या पत्रात रामनाथ सोनवणे हे कल्याण डोंबिवली पालिकेच्या आस्थापनेवरील स्थानापन्न उपायुक्त संवगार्तील अधिकारी आहेत. त्यामुळे चिकणघर येथील टीडीआर घोटाळ्याची चौकशी आयुक्तांनी करावी, असे स्पष्ट केले आहे. सोनवणे यांनी अनेक वर्ष उल्हासनगर, जळगाव, कल्याण डोंबिवली पालिकेत आयुक्त म्हणून काम केले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेतून उचलबांगडी झाल्यापासून शासनाने त्यांना अद्याप कोठेही नियुक्ती दिलेली नाही.गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कल्याणमधील टीडीआर घोटाळाप्रकरणी सोनवणे यांची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिले होते. महिना उलटला तरी नगरविकास विभागाकडून सोनवणे यांची चौकशी होत नसल्याने टीडीआर घोटाळा प्रकरणातील तक्रारदारांनी शासन सोनवणे यांना अभय देण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार विधान परिषदेच्या सभापतींकडे केली होती. प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने नगरविकास विभागाने उपायुक्त सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावणे व त्यांची विभागीय चौकशी महापालिका आयुक्तांनी करावी, असे आदेश दिले आहेत. सोनवणे यांची चौकशी केल्यानंतर अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घोटाळ्यात महापालिकेच्या नगररचना विभागातील तत्कालीन आयुक्तांचा सहभाग असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणे व त्यांची चौकशी करण्याचे आदेश शासनाने प्रशासनाला यापूर्वीच दिले होते.