शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

साठाव्या वर्षी पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:11 IST

अंबरनाथ तालुक्यातील काराव येथील सुभाष शेलवले यांनी ‘आशियाई स्पर्धा २०१८’ मध्ये पॉवर लिफ्टिंग या खेळाच्या ८३ किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

बदलापूर : अंबरनाथ तालुक्यातील काराव येथील सुभाष शेलवले यांनी ‘आशियाई स्पर्धा २०१८’ मध्ये पॉवर लिफ्टिंग या खेळाच्या ८३ किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. एखाद्या क्षेत्रात सातत्याने प्रामाणिकपणे मेहनत केली तर यश मिळतेच, हे अंबरनाथ येथील आयुध निर्माणी कारखान्यातील कामगार सुभाष शेलवले यांनी दाखवून दिले आहे.वयाच्या साठाव्या वर्षी पॉवर लिफ्टिंग या क्र ीडा प्रकारात आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने सुभाष शेलवले हे चर्चेत आहेत. उदयपूर, राजस्थान येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत ५० देशांत झालेल्या या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना सुभाष शेलवले यांनी सुवर्णपदक पटकावले. तिरंगा फडकावण्याचा बहुमान व सुवर्ण कामगिरी करणारे शेलवले हे अंबरनाथ तालुक्यातील काराव या गावातील रहिवासी आहेत. अंबरनाथ येथील आयुध निर्माणी येथे सेवेत आहेत.तालुक्यातील काराव येथे राहणारे शेलवले यांचे वांगणी येथील महात्मा फुले विद्यामंदिर शाळेतून जुनी अकरावी मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर, शासनाच्या रोजगार विनिमय केंद्रातून आयुध निर्माणी कारखान्यात कामगार म्हणून ते रुजू झाले. नियमित व्यायाम करण्याची त्यांची सवय. त्यातूनच सुभाष शेलवले हे कबड्डी खेळू लागले. ते राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धांमध्येही सहभागी झाले आहेत. यासोबतच पॉवर लिफ्टिंग क्र ीडा प्रकारातदेखील त्यांनी सराव कायम ठेवला होता. जिल्हा, विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके पटकावली. राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ८३ किलो वयोगटात सुवर्णपदक पटकावून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. बेंच स्पेस, स्कॉट आणि डेड लिफ्ट या तिन्ही प्रकारांत मिळून त्यांनी स्पर्धेत एकूण ३६७ किलो वजन उचलले.