--------------------------------------
कल्याण पूर्वेत शटडाउन नाही
कल्याण : उल्हास नदीची पाणीपातळी कमी झाल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू आहे. त्यामुळे मंगळवारचे शटडाउन कल्याण पूर्वेत होणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. कल्याण पूर्व वगळता इतर ठिकाणी शटडाउन होणार असल्याचेही संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.
----------------------------------------
गर्दुल्ल्यांचे केंद्र
कल्याण : पश्चिमेतील बारावे परिसरातील बीएसयूपी प्रकल्प धूळखात पडला आहे. बांधलेल्या सदनिका बाधितांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या सदनिकांमध्ये गर्दुल्ले आणि व्यसनी लोकांचा वावर वाढला असून केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याकडे विशेष लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
-----------------------------------------
अतिक्रमणांवर कारवाई
कल्याण : शनिवारी केडीएमसीच्या अ प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्या पथकाकडून बल्याणी याठिकाणी बेकायदा उभारलेल्या मोबाइल टॉवरवर कारवाई करण्यात आली. तसेच टिटवाळा येथील मौर्यानगर याठिकाणी चालू असलेले चाळीचे अनधिकृत बांधकामही तोडण्यात आले. हे बांधकाम इतके कच्चे होते की, कर्मचाऱ्यांनी हाताने भिंत ढकलली असता ती कोसळली. भूमाफियांकडून अशाप्रकारची बांधकामे उभी करून एकप्रकारे नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचेही यावरून समोर आले.
फोटो आहे
....
खड्डा बुजविण्याची मागणी
डोंबिवली : ठाकुर्ली उड्डाणपुलाजवळील पूर्वेतील भागात जलाराम मंदिर रोडवर मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात आदळून दुचाकीस्वार जखमी होत आहेत. शनिवारपासून या खड्ड्यात दोन दुचाकीस्वारांना अपघात झाला. खड्डा त्वरित बुजवण्यात यावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा, अपघात होऊन नाहक जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडेही लक्ष वेधले जात आहे.
------------------------------------------------------