कल्याण: न्यायालयापाठोपाठ राज्यशासनाने घालून दिलेल्या अटी, पावसाची पाठ आणि रणरणते ऊन या वातावरणात रविवारी पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात कल्याण डोंबिवलीत काही अपवाद वगळता फारसा उत्साह दिसून आला नाही. दरम्यान बहुतांश आयोजकांकडून खर्चाला फाटा देऊन त्याची रक्कम आपत्तीग्रस्तांना देण्यात आली.शहरातील मुख्य चौकांसह गल्लोगल्लीत दरवर्षी दिसून येणाऱ्या हंडया यंदा दिसल्या नाहीत. सायंकाळी बघ्यांची काहीप्रमाणात गर्दी झाली असली तरी त्यात पूर्वी सारखा उत्साह नव्हता. यंदा गोविंदा पथकांची संख्याही रोडावली.कल्याणातील आढावा घेता बहुतांश आयोजकांनी आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला. येथील शिवसेना शहर शाखेच्या वतीने शिवाजी चौकात साजरा केलेल्या उत्सवात ठाकुर्ली येथील इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५हजार रूपयांची मदत देण्यात आली. मनविसेचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्यावतीने बेतुरकरपाडा येथे आयोजित केलेल्या उत्सवात ३० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली. मदतीसाठी आयोजकांबरोबरच गोविंदा पथकांचा देखील पुढाकार होता. जुनी डोंबिवली मित्र मंडळ या गोविंदा पथकांना सलामीतून मिळालेली रककम ते अभिनेता नाना पाटेकर यांच्या दुष्काळग्रस्त मदत निधीला देणार आहेत. डोंबिवलीतील कोपर रोड शिवसेना शाखेच्या वतीने प्रकाशमय जीवनाची संदेश देणारी दहीहंडी बांधण्यात आली होती. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने विनामूल्य नेत्रचिकित्सा शिबीरासाठी ही हंडी अर्पण केल्याचे आयोजक संजय पावशे यांनी सांगितले. आमदार रविंद्र चव्हाण यांनी पुर्वेकडील बाजीप्रभु चौकात उभारलेल्या मोठया रकमेची दहीहंडी फोडण्यासाठी शहरातीलच नव्हे तर ठाणे, मुंबईतील पथके डोंबिवलीत दाखल झाली होती. दहीहंडी रद्द करून लाखाची मदतपडघा: मीनाक्षी फाऊंडेशनतर्फे दहिहंडी आयोजिली होती. मात्र शबाना शेख यांचा मृत्यू झाल्याने ती रद्द केली. तिचे एक लाख शेख कुटुंिबयांना खासदार पाटील यांच्या हस्ते दिले.खर्डीत पारंपरिक पद्धतीने खर्डी: कृष्ण अष्टमीचा सण पारंपारीक पध्दतीने पार पडला. रात्री गावातील मंदिरामध्ये कृष्ण जन्मोत्सव भक्तीभावाने भजन किर्तनाच्या गजरात पार पडला. टिटवाळ्यात उत्साहात टिटवाळा : शहरासह ग्रामीण भागात मोठयÞा उत्साहात दहीहंडी झाली. डीजेच्या तालावर फेर धरत बाळ गोविंदासह मोठ्या गोविंदानी दहीहंडयÞा फोडल्या.बोल बजरंग...दहीहंडी फोडण्यासाठी पूर्वीपासून व्यायामपट्टूचे सर्वांनाच आकर्षण. हल्ली ट्रेंण्ड बदलतो आहे. तेव्हा वर्तकनगरमधील गोविंदाने लक्षवेधण्यासाठी असा हनुमानाचा मुखवटे धारण केला.तारकांचे आकर्षणठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानची दहिहंडीला रविवारी चित्रपट अभिनेता सुनिल शेट्टीने कन्येसह भेट दिली. सोबत सूरज पंचोली व रविंद्र फाटक.सोफिया झाली मोहीतठाण्यातल्या रघुनाथनगरमधल्या गोविंदाची मोहिनी ब्राझिलच्या सोफियालाही इतकी पडली की, तिला हा सोहळा शूट करावासा वाटला.
गोपिकांचाही जल्लोष
By admin | Updated: September 7, 2015 03:58 IST
न्यायालयापाठोपाठ राज्यशासनाने घालून दिलेल्या अटी, पावसाची पाठ आणि रणरणते ऊन या वातावरणात रविवारी पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात कल्याण डोंबिवलीत काही
गोपिकांचाही जल्लोष
ठाणो: न्यायालयांचे र्निबध, पाण्याचा किमान वापर, डीजेची अनुपस्थिती, खालती संरक्षक गादी, दुष्काळाचे सावट असे संमिo्र वातावरण जरी यावर्षी असले तरी यंदा गोविंदांचा उत्साह नेहमीसारखाच जल्लोषपूर्ण होता.जिल्ह्यात महिलापथकेही तितक्याच उत्साहात सहभागी झाली होती. या गोविंदा पथकांनी शनिवार मध्यरात्रीपासूनच दही हंडी फोडण्यास सुरूवात केली होती.
सेफ्टी बेल्ट, विमा कवच, आदींची व्यवस्था करून आयोजकांनीही गोविंदांची काळजी घेतली होती. न्यायालय तसेच राजकीय घडामोडींचा विचार करता दही हंडीचा उत्साह ओसरला आहे असे वाटत होते. अनेक गोविंदा पथकांनीही दही हंडीमध्ये सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतली होती.
तसेच मुंबईच्या पथकांनीही ठाण्यामध्ये हंडी न फोडण्याचा निर्णय घेतला होता मात्र प्रत्यक्षात ही सारी कटुता विसरून मुंबईतील गोविंदा पथकांनी ठाण्यातील दही हंडीला भरभरून प्रतिसाद दिला. गोविंदांच्या ट्रक, टेम्पोंमुळे ट्रॅफिक जॅम होऊ नये म्हणून ते हायवेलगतच पार्क करायचे व गोविंदांनी पायी दहीहंडीच्या ठिकाणार्पयत जायचे असा नवा पायंडा पोलिसांनी गेल्या दोन वर्षापासून पाडला होता. तो यंदाही अनुसरला गेला. यामुळे अनेक गोविंदांनी ट्रक, टेम्पाेंऐवजी दुचाकींवरून डबल अथवा टिबल सीट जाणो पसंत केले होते. तसेच मोटरसायकलवर उभे राहून काहींनी स्टंट करण्याचाही प्रय} केला. गोविंदा पथकांच्या वाहनामध्येही डिजे, ढोल ताशे न वापरता मंद सुरात वाजणारा साधा डेक लावण्यात आला होता.