शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पश्चिममधील बकरा बाजार तातडीने बंद करा -  नरेंद्र पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 15:56 IST

विरोधी पक्षनेते, पशु संवर्धन मंत्री जिल्हाधिकारी व आयुक्तांना दिले निवेदन

डोंबिवली: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात दर मंगळवारी व शनिवारी बकरा बाजार भरवला जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात जास्त लोक एकत्र येण्यास बंदी असतानाही हा बाजार सुरू आहे आणि मुंबई व इतर परिसरातील बकरा बाजार बंद असल्याने बाहेरच्या शहरातूनही बकरे खरेदीसाठी प्रचंड गर्दी सदर ठिकाणी येत आहे. कल्याण पश्चिममध्येही कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्यामध्ये या बेकायदेशीर बाजारामुळे मोठा धोका असल्याने सदर बाजार तातडीने रद्द करा अशी मागणी माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी केली आहे. 

यासंदर्भात त्यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पशु संवर्धनमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कडोंमपा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी व पोलीस आयुक्त श्री. फणसाळकर यांना निवेदन दिले आहे.  ज्या परिसरात हा बाजार भरत आहे. त्या परिसरात कोरोना बाधित रुग्णही आढळून आले आहेत व प्रशासनाने त्याला कंटेंमेंट झोनही जाहीर केला आहे. जवळच फोर्टीस हॉस्पिटलसुद्धा आहे. अशा परिस्थितीत सदर बाजार असाच सुरू राहणे हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रशासनाने दिलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन त्याठिकाणी होताना दिसत नाही यावर कारवाई करून तातडीने निर्णय घ्यावा अशीही मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे