शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सरकत्या जिन्याची जागा रेल्वेकडून चुकली, प्रवाशांना सोयीपेक्षा गैरसोयीचेच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 03:47 IST

एखादी योजना मंजूर झाल्यावर ती कशीबशी पूर्ण करण्याची घाई सध्या रेल्वे प्रशासनाची सुरू आहे. अंबरनाथ स्थानकात सरकत्या जिन्यांची नितांत गरज होती.

अंबरनाथ : एखादी योजना मंजूर झाल्यावर ती कशीबशी पूर्ण करण्याची घाई सध्या रेल्वे प्रशासनाची सुरू आहे. अंबरनाथ स्थानकात सरकत्या जिन्यांची नितांत गरज होती. मात्र, तो ज्या फलाटावर बसवणे गरजेचे होते, त्या ठिकाणी न बसवता थेट स्थानकाबाहेर बसवण्यात येत आहे. पश्चिम भागातून स्टेशनला येण्यासाठीच या जिन्याचा वापर होणार आहे. मात्र, या जिन्याचा चढ चुकीच्या ठिकाणी दिल्याने त्याचा वापर रेल्वे प्रवाशांना सोयीचा होणार नाही, हे मात्र निश्चित.अंबरनाथ स्थानकात तीन फलाट आहेत. त्यातील एक आणि दोन हे फलाट एकाच ठिकाणी आहेत, तर तीन नंबरचा फलाट हा स्वतंत्र आहे. तीन नंबर फलाटावर केवळ मुंबईच्या दिशेने जाणाºया गाड्या येत असल्याने अंबरनाथ स्थानकात उतरणाºया प्रवाशांची संख्या अल्प आहे. त्यामुळे फलाटावर सरकत्या जिन्याची तशी जास्त गरज नाही. अंबरनाथ स्थानकात खरी गरज ही फलाट क्रमांक-१ आणि २ वरच आहे. या दोन्ही फलाटांचा जिना हा एकत्रित असल्याने त्या ठिकाणी सरकता जिना बसवणे गरजेचे आहे. कारण, याच फलाटांवर मुंबईहून कर्जत दिशेकडे जाणाºया लोकल येतात, तर फलाट क्रमांक-२ वर मुंबईहून अंबरनाथला आलेली गाडी थांबते. त्यामुळे या दोन्ही स्थानकांचा एकत्रित जिना हा सरकता असावा, अशी प्रवाशांची मागणी होती. अंबरनाथकरांची सरकत्या जिन्याची मागणी पूर्ण झालेली असली, तरी तो जिना ज्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे, ती जागा मात्र चुकली आहे.अंबरनाथ पश्चिम भागातील तिकीट खिडकीच्या बाजूला हा जिना बसवण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, ज्या ठिकाणी हा जिना बसवण्यात येणार आहे, त्याचा वापर हा प्रवाशांना त्रासदायक आहे. तिकीट खिडकीकडे येण्यासाठी प्रवाशांना पादचारी पूल चढून पुन्हा खाली उतरावे लागते. त्यामुळे पश्चिम भागातील प्रवाशांना सरकत्या जिन्याचा वापर करायचा झाल्यास त्या प्रवाशांना आधी पादचारी पूल चढावा लागणार आहे. पुन्हा खाली उतरून हा सरकता जिना वापरावा लागणार आहे. त्यामुळे या सरकत्या जिन्याचा वापर करण्याऐवजी जिने चढणे हेच प्रवाशांसाठी सोयीचे झाले आहे.ज्या ठिकाणी सरकता जिना बसवण्यात येत आहे, त्या तिकीट खिडकीपर्यंत येण्यासाठी प्रवाशांना चांगला रस्ता तयार करून दिलेला नाही. जिना चढून पुन्हा खाली उतरून तिकीट काढावे लागते. त्यामुळे या सरकत्या जिन्याचा वापर करावा कसा, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. या सरकत्या जिन्याचा वापर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने आता पालिकेच्या पार्किंग झोनमधून रस्ता काढण्याची शक्कल काढली आहे. मात्र, ज्या ठिकाणी हा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्या ठिकाणी आधीच गाड्या उभ्या राहत असल्याने तो रस्ता अपुरा पडत आहे. तसेच उर्वरित रस्त्यावर रिक्षातळ असल्याने पादचाºयांना चालण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सरकत्या जिन्यापर्यंत आणण्याचा मार्ग हा फसल्यात जमा झाला आहे.>फलाट क्र.-१, २ साठी नवा पूलयासंदर्भात रेल्वेच्या अधिकाºयांना विचारले असता फलाट क्रमांक-१ आणि २ वर जिने बसवण्यासाठी नव्या पुलाची गरज भासणार आहे. सध्याच्या पुलाला सरकता जिना जोडणे शक्य नसल्याने हा जिना तिकीट खिडकीजवळ बसवण्यात आल्याचे स्पष्ट केले.