शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला विरोधी पक्षनेतेपद द्या

By admin | Updated: February 28, 2017 03:34 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पुरुष फिल्डिंग लावून बसले असताना महापौरपद महिलेला दिले जाणार असेल तर विरोधी पक्षनेतेपदी महिलाच बसवावी

ठाणे : ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पुरुष फिल्डिंग लावून बसले असताना महापौरपद महिलेला दिले जाणार असेल तर विरोधी पक्षनेतेपदी महिलाच बसवावी, अशी चर्चा सुरु झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या रस्सीखेचीत जितेंद्र आव्हाड व गणेश नाईक हे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत.नाईक गटाने महिलेला विरोधी पक्षनेतेपद देण्याचा आग्रह धरला आहे तर पुरुषांमध्ये पुन्हा नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे यांची नावे पुढे आली आहेत. मुंब्य्रातून शानू पठाण यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. महिलेला विरोधी पक्षनेतेपद देण्यावरुन आव्हाड आणि नाईक गटांत जुंपण्याची चिन्हे आहेत.महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पिछाडीवर पडेल, अशी शक्यता असताना पक्षाचे ३४ आणि एक पुरस्कृत असे एकूण ३५ नगरसेवक विजयी झाले. यामध्ये सर्वाधिक नगरसेवक आव्हाड गटाचेच आहेत. निवडणुकीपूर्वी डावखरे गटाच्या नगरसेवकांनी इतर पक्षांत आपली चूल मांडली व राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेला त्यांचा एक उमेदवारही निवडणुकीत पडला. कळव्यातून नाईक गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हालचाली केल्या होत्या. परंतु, अधिकृत उमेदवारापुढे अपक्ष उमेदवार देऊन आव्हाड गटाने या अपक्षाला निवडून आणून नाईकचे मनसुबे उधळून लावले.या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेतेपद महिलेला द्यावे, असा हट्ट नाईक गटाने सुरू केला असून तसा पत्रव्यवहार केल्याचे समजते. नाईक गटाने रेटलेली ही मागणी मान्य झाली तर सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आलेल्या प्रमिला केणी यांच्याकडे विरोधीपक्ष नेतेपद सोपवले जाईल. मात्र यासंदर्भात आव्हाड गटाला अद्याप काहीच माहिती नसल्याचे समजते. मात्र आव्हाड गटाकडून हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला या दोघांची नावे विरोधी पक्षनेतेपदाकरिता पुढे केली जात आहेत. हे दोघे बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात अटकेत होते. त्यामुळे या निकषावर त्यांना हे पद नाकारले तर मुंब्य्राला न्याय देण्यासाठी अशरफ ऊर्फ शानू पठाण यांच्या नावाचीही चर्चा आहे. (प्रतिनिधी)-विरोधी पक्षनेतेपदाकरिता वेगवेगळ््या मागण्या केल्या जात असल्या तरी याबाबत अंतिम निर्णय श्रेष्ठीच घेतील.- आनंद परांजपे,शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस