शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या पहिल्या दिवशी आम्हाला साहित्य द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:10 IST

महापालिका शाळेच्या हजारो मुलांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळू नका. शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य द्या, अशी मागणी मुलांसह पालकांनी पालिका शिक्षण मंडळाकडे केली आहे.

उल्हासनगर : महापालिका शाळेच्या हजारो मुलांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळू नका. शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य द्या, अशी मागणी मुलांसह पालकांनी पालिका शिक्षण मंडळाकडे केली आहे.उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळांतर्गत विविध माध्यमांच्या २८ शाळा आहेत. शाळेत एकूण सहा हजारांपेक्षा अधिक मुले असून शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य देण्याची प्रथा आहे. मात्र, मंडळातील सावळ्या गोंधळामुळे शैक्षणिक सहित्य देण्याच्या पायंड्याला ब्रेक लागला आहे. गेल्या वर्षी दसरा-दिवाळीदरम्यान शैक्षणिक साहित्य दिल्याने सर्वस्तरांतून टीका झाली. मुलांचे अर्धे वर्ष संपल्यानंतर शैक्षणिक साहित्य मिळाले. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून पालकांनी शिक्षकांसह शिक्षण मंडळाकडे शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य देण्याची मागणी केली आहे.महापालिका शाळेत शैक्षणिक घोळ झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महापौर मीना आयलानी यांनी दिली. मुलांना बँकेत खाते उघडण्याचे शिक्षकांनी सांगितले. मात्र, एका वर्षात फक्त २० टक्के मुलांनी बँक खाते उघडले आहे. सरकारच्या नियमानुसार मुलांनी शैक्षणिक साहित्य खरेदी करून त्यांची बिले शाळांना सादर केल्यास तेवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असा नियम आहे. मात्र, बहुतांश मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पालकांना मुलांच्या नावाने बँक खाते उघडणे गैरसोयीचे झाले. त्यामुळेच गेल्या वर्षी शैक्षणिक साहित्य खरेदीत सावळागोंधळ उडाला होता. अर्धे वर्ष उलटल्यानंतर साहित्य मिळत असेल तर विद्यार्थी अभ्यास कसा करणार असा सवाल पालकांनी केला.