शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या लग्नाचा आहेर रुग्णालयाला दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:02 IST

११ लाखांची मदत; वसई तालुक्यातील पीटर फर्नांडिस यांचा वेगळा आदर्श

पारोळ : लग्न म्हटले की, जवळ पैसा असो वा नसो पै-पाहुण्यांना अहेर, मान्यवरांना फेटे आणि डॉल्बीचा दणदणाट असा काहींसा माहोल असतो. विविध कार्यक्रमांत केवळ प्रसिद्धीसाठी वारेमाप खर्च करणारी मंडळी मोठ्या संख्येने आढळतात. मात्र, वसईतील एका पित्याने मुलीचा लग्नसोहळ्यात  आलेल्या अहेरात पदरच्या आणखी पैशांची भर टाकत रुग्णालयाला आर्थिक मदत करत एक वेगळाच आदर्श लोकांपुढे ठेवला आहे. वसईतील ख्रिस्ती बांधवांचे लग्नसोहळेदेखील मोठ्या थाटात पारंपरिक पद्धतीने साजरे होत असतात.  कोणत्या गोष्टींवर कोणी किती आणि कसा खर्च करावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी ज्यावर आपण खर्च करणार आहे, असा कोणताही कार्यक्रम पुढील आयुष्यासाठी आठवणीतून प्रेरणादायी ठरावा, यासाठी वसईतील वाघोली गावातील पीटर फर्नांडिस यांनी एक वेगळाच आदर्श लोकांपुढे ठेवला आहे.  तानिया या त्यांच्या मुलीचा माणिकपूर येथील मार्क डाबरेसोबत लग्नसोहळा आप्तस्वकियांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला. लग्नानंतर आलेल्या अहेराची पाकिटे फोडली असता तब्बल पाच लाख रुपये अहेर तानियाला भेटीदाखल आला होता. पिटर फर्नांडिस सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असून त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे. त्यामुळे मुलीच्या लग्नात आलेला पाच लाख अहेर समाजकल्याणासाठी वापरण्याचा निर्णय कुटुंबातील सदस्यांनी घेतला. स्वत: दिले सहा लाख पिटर यांनी आपल्याकडील आणखीन सहा लाख रुपयांची भर टाकून अकरा लाख रुपयांचा धनादेश मुलीच्या लग्नाप्रीत्यर्थ वसईतील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयाला मदतीसाठी दिला. यावेळी पिटर फर्नांडिस, मोनिका फर्नांडिस, फादर अंब्रोज फर्नांडिस, तानिया फर्नांडिस-डाबरे, मार्क डाबरे, कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयाचे चेअरमन ॲन्सन परेरा, थाॅमस  ब्रिटो, युरी घोन्सालवीस आदी मान्यवर उपस्थित होते.