शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

धमक्या देऊन मैत्रिणीवर बलात्कार

By admin | Updated: June 1, 2017 04:53 IST

एकोणीस वर्षीय मैत्रिणीला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि तिने नकार देताच तिचा सतत पाठलाग तसेच तिला

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : एकोणीस वर्षीय मैत्रिणीला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि तिने नकार देताच तिचा सतत पाठलाग तसेच तिला मारहाण करून छळणाऱ्या इंद्रेश हरिशंकर पांडे (२४, रा. नायगाव, वसई) याला नयानगर पोलिसांनी अटक केली.मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या या तरुणीची तीन वर्षांपूर्वी महाविद्यालयात असतानाच आरोपीशी ओळख झाली. आरोपीने आधी मैत्री आणि नंतर दमदाटी करत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पांडेच्या शोषणाला कंटाळून तरुणीने त्याला टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो मीरा रोड येथे येऊन तिचा पाठलाग करणे, तिच्याशी वाद घालून मारहाण करणे, तिला धमकावणे आदी प्रकार सुरू केले. त्याच्यापासून सुटका व्हावी, यााठी अखेर तिने आपल्या कुटुंबीयांना पांडेबद्दल सांगितले. कुटुंबीयांसह सहकाऱ्यांसोबत तिने नयानगर पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या निर्देशानंतर पोलिसांनी तरुणीच्या फिर्यादीनुसार विनयभंग, धमकावणे आदीप्रकरणी गुन्हा दाखल करून त्वरित आरोपी पांडेला नायगाव येथील त्याच्या घरातून अटक केली. त्रास झाला असह्यतीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून अखेर तिने पोलिसांत तक्रार केली. भीतीमुळे आपल्यावर बलात्कारही पांडेने केल्याची माहिती तिने नंतर दिली. पोलिसांनी पीडित तरुणीचे म्हणणे पुन्हा नोंदवून पांडेवर बलात्काराचा गुन्हासुद्धा दाखल केला आहे.