शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

घुमला शाहिरांचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 02:24 IST

गायक नंदेश उमप यांनी सादर केलेला पोवाडा, शिवाय कोळीनृत्य, जाखडी नृत्य, ठाणे-मुंबईतील शाहिरांनी दमदार आवाजात सादर केलेली गीते

ठाणे : गायक नंदेश उमप यांनी सादर केलेला पोवाडा, शिवाय कोळीनृत्य, जाखडी नृत्य, ठाणे-मुंबईतील शाहिरांनी दमदार आवाजात सादर केलेली गीते, रसिकांचा उदंड प्रतिसाद यातून ठाण्यात प्रथमच आयोजित केलेला महाराष्ट्र शाहिरी लोककला महोत्सव चांगलाच रंगला. तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात ७८ वर्षीय शाहीर कृष्णकांत जाधव यांनी सादर केलेल्या संयुक्त महाराष्ट्रावरच्या गोंधळाला ज्येष्ठांबरोबर तरुणांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी शिवाजी मैदानात शाहिरी महोत्सवाचे आयोजन केले होते. सुरुवातीला ह.भ.प. दयानंद भोईर यांच्या नेतृत्वाखाली जांभळी नाका येथील गणपती मंदिर ते शिवाजी मैदानादरम्यान महोत्सवाची दिंडी काढण्यात आली. गणेशवंदनेनंतर शाहीर मधू खामकर आणि निलेश जाधव यांनी गण सादर केले. जय मल्हार नृत्याविष्काराने वातावरण भारून टाकले. खंडोबाच्या भूमिकेत संजीव मोरेकर यांचा प्रवेश होताच प्रेक्षकांतून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा आवाज निनादू लागला. ‘जयदेवा जयदेवा जय शिवमार्तंडा,’ ‘बानू बया बानू बया’ या गीतांवर नृत्य सादर होताच प्रेक्षकांनी परिसर डोक्यावर घेतला. या नृत्याविष्कारावर प्रेक्षकांच्या नजरा अक्षरश: खिळल्या. नृत्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सादर करण्यात आला. श्रेयसी व संस्कृती नाखवा नृत्यदिग्दर्शित जोगवा, पौर्णिमा सूर्यवंशी हिने महाराष्ट्राची लावणी, लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया यांचे सादरीकरण केले, तर शाहीर शांताराम चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित पोवाडा, शाहीर निलेश जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा, किरण ढोले यांनी खेळ मांडला, शाहीर शांताराम धनावडे यांनी माझी मैना गावाकडे राहिली आदी गीते सादर केली. गायिका शकुंतला जाधव यांनी बाबू टांगेवाला, अहो आबा..., मना लगीन कराया पाहिजे सादर करत वाहवा मिळवली. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असा संदेश देणाऱ्या गीताचे शाहीर अर्जुन अटाळीकर यांनी सादरीकरण केले. डॉ. प्रमोद नलावडे यांनी सादर केलेल्या दादा कोंडके पॅच आणि फू बाई फू फेम संतोष पवार यांच्या विनोदी प्रहसनांनी खसखस पिकवली. शाहीर दत्ता ठुले यांनी सादर केलेल्या विंचू चावला या भारुडाला रसिकांनी भरभरून दाद दिली. कोळीनृत्याने महोत्सवाचा समारोप करण्यात आला. शाहीर महादेव शेरेकर, पखवाजवादक रणजित परब, शाहीर निलेश जाधव, नृत्यांगना अप्सरा जळगावकर, लोककलावंत विनोद नाखवा, संतोष पवार, शिल्पकार देवानंद पाटील, डॉ. प्रमोद नलावडे, अशोक हांडे, जादूगार ज्ञानेश्वर डोंगरे, शाहीर मधू खामकर, साहित्यिक-कवी महेंद्र कोंडे, गायक नंदेश उमप, शाहीर अर्जुन अटाळीकर, शाहीर तुकाराम मानकर, गायिका शकुंतला जाधव आदींना महाराष्ट्र लोकगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.