शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर, येऊर, टिकुजी-नी-वाडी, कशेळी परिसरातील पब, बारमध्ये पहाटे पर्यंत हैदोस

By अजित मांडके | Updated: May 28, 2024 16:16 IST

 कारवाईची आनंद परांजपे यांची मागणी

ठाणे : घोडबंदर, येऊर, कोलशेत, टिकुजी-नी-वाडी, बाळकुम आदीसह कशेळी भागात आजही राजरोसपणे अनधिकृत पब, बार, हुक्का पार्लर सुरु आहेत. त्यावर अद्यापही कारवाई केली जात नसल्याची बाब समोर आली आहे. टिकुजी-नी-वाडी परिसरात असलेल्या बार, पब मध्ये मध्यरात्रीपर्यंत तरुण तरुणांचा धिगाणा सुरु असतो, रात्रीच्या सुमारास येथील रस्ते देखील या मद्यपींमुळे गजबजल्याचे दिसत आहेत. त्यात कशेळी भागात खाडी किनारी, खाडी बुजवून येथे पहाटे पर्यंत धिंगाणा सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांनी लक्ष घालून हे पब, बारवर कारवाई करावी. तसेच मद्य पिऊन वाहन चालविणाºयांच्या विरोधात वाहतुक विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.

घोडबंदर रोडवरील शेतजमीन आणि वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे करून बेकायदा हॉटेल्स, बार आणि हुक्का पार्लर वर कारवाई काही दिवसापूर्वी झाली. परंतु  पुण्यातील बार व पब्ज मधून मद्यपान करुन ड्रिंक अँड ड्राइव्ह अपघात झालेली घटना ताजी असतानाच आता त्याचीच पुनरावॄत्तीची घटना ठाण्यातही घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कशेळी खाडी किनारी सीआरझेड धाबे जोरात राजरोसपणे, पहाटे पर्यत सुरु असतात. कोलशेत, बाळकुम येथे देखील अशीच काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. त्यातही अशा पध्दतीने पब, बार, हुक्का पार्लर चालविणाऱ्यांकडे अग्निशमन विभागाचाही परवाना नसल्याचे दिसून आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची खाडी किनारी अनधिकृतपणे मद्यविक्रीस परवानगी नसतानाही मद्यविक्री राजरोसपणे बिनधास्तपणे सुरू आहे. या खाडीपरिसरात ध्वनिप्रदूषणास बंदी आहे. मात्र तरीही पहाटे पर्यंत धिंगाणा सुरु असल्याचे चित्र आहे.

असेच काहीसे चित्र टिकुजी-नी-वाडी परिसरात देखील दिसून येत आहे. या ठिकाणी पबमध्ये तर तरुण तरुणींचा तांडाच रात्री ११ नंतर येथे गिरट्या घालतांना दिसून येत असतो. तो मध्यरात्री पर्यंत या भागात धिंगाणा सुरुच असतो. मात्र त्याकडेही कोणाकडेही लक्ष जात नसल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अशा पब, बार, हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची मागणी आनंद परांजपे यांनी पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी देखील मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात मनुष्यबळ वाढवून कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. घोडबंदर, येऊर या भागात अशा पध्दतीने सुरु असलेल्या पब आणि हुक्का पार्लरवर तत्काळ कारवाई करावी असेही ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणे