शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पीआरटीएस प्रकल्पाला मिळणार चालना, सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 14:40 IST

ठाणे महापालिकेने सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आता पीआरटीएसची अनोखी संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार या संदर्भातील सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देकमी वेळेत होणार जलद प्रवाससहा प्रवासी बसण्याची क्षमता

ठाणे - सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम करणाऱ्या तसेच मेट्रो प्रकल्पाला पुरक ठरणारी वैयक्तीक जलद वाहतूक यंत्रणा अर्थात पीआरटीएस प्रकल्प राबविण्याबाबतची अनुकुलता महपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दर्शविली असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठीची प्रक्रि या करण्यात येणार आहे. त्यानुसार आता येत्या महासभेत या संदर्भातील सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने ही सेवा कितपत फायदेशीर ठरणार या संदर्भातील सुसाध्यता अहवाल तयार केला जाणार आहे.                     ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चालना दिल्यानंतर आता पीआरटीएस या महत्वांकाक्षी प्रकल्पाला चालणा देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. फेबु्रवारी महिन्यात आयुक्तांनी ही संकल्पना पुढे आणली होती. त्यानंतर ही सेवा कळवा, मुंब्रा आदी भागांसाठी देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. अंतर्गत मेट्रोबरोबरच पीआरटीएसची मार्गिकेचे कामही एकाच वेळेस सुरु करण्याचा पालिकेचा मानस आहे. अतिशय कमी जागेत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असून या वाहनाची क्षमता कमीत कमी आणि जास्तीत जास्त ६ व्यक्ती बसतील एवढी आहे. ड्रायव्हरविरहित लेसरवर आधारीत तंत्रज्ञानावर आधारीत ही यंत्रणा आहे. त्याचप्रमाणे पीआरटीएसचा ट्रॅकही प्रीफॅब्रिकेटेड पद्धतीने कमी वेळात बनविता येऊ शकणार आहे.                      महाराष्ट्र मेट्रोतंर्गत वडाळा ते कासारवडवली या दरम्यान मेट्रो धावणार आहे. त्याचबरोबर अंतर्गत मेट्रोची मार्गिका अंतीम करून त्या मार्गिकेला पीआरटीएस जोडल्यास प्रवाशांना मेट्रो पकडण्यासाठी जी पायपीट करावी लागणार आहे ती पूर्णत: थांबणार आहे. दरम्यान मेट्रोची मार्गीका ही घोडबंदर रोडवरून कासारवडवलीपर्यंत असल्याने कळवा आणि मुंब्रा याठिकाणच्या प्रवाशांना पीआरटीएसचा फायदा होणार आहे. अंतर्गत मेट्रोच्या मार्गिकेला पीआरटीएसची मार्गिका जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना दुहेरी फायदा होणार आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त