शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या तुटवड्यावरून महासभा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:40 IST

ठाणे : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोविड सेंटर उभारूनही त्या ठिकाणी मनुष्यबळ नसल्याने ती बंद आहेत. ...

ठाणे : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोविड सेंटर उभारूनही त्या ठिकाणी मनुष्यबळ नसल्याने ती बंद आहेत. ऑक्सिजन नसल्याने बेड रिकामे असून ऑक्सिजनसह रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांच्या हातावर लावण्यासाठी शाई नाही, वॉरचा कारभार राम भरोसे असून पीपीई किट नसल्याने मृतदेह चक्क प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून देण्याचा प्रकार घडला आहे. प्रशासनाच्या चुकांमुळे ही वेळ ठाणेकरांवर आल्याचा आरोप मंगळवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी समिती स्थापण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.

मंगळवारी महासभा सुरू होताच राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे आणि भाजपचे नारायण पवार यांनी लक्षवेधी मांडून, प्रशासनाचे लक्ष वेधून ऑक्सिजनसह रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले. विक्रांत चव्हाण यांनी कोविडसाठी निधी देऊनही त्याचे नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे पुढील तीन वर्षांचे योग्य नियोजन करून निधी उपलब्ध करून या आजारावर नियंत्रण कसे मिळविता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. पवार यांनी मृतांची आकडेवारी वाढत आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पीपीई किट मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मनोहर डुंबरे यांनी खासगी रुग्णालयातील मृतदेह एक दिवस उलटूनही उचलले जात नसल्याचा आरोप केला. शिवसेनेचे विकास रेपाळे यांनी कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळ वाढविण्याची मागणी केली. दिव्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना येथे अद्याप एकही कोविड सेंटर नसल्याची खंत बाबाजी पाटील यांनी व्यक्त केली. वॉर रूमची समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांवर जबाबदारी द्यावी, अशी मागणी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली.

गरीब रुग्णांना ग्लोबलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्याऐवजी खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा अजब सल्ला महापालिकेकडून दिला जात असल्याचा आरोप यावेळी अनिता गौरी यांनी केला. डॉक्टर रुग्ण दाखल करून घेण्यासाठी घाबरत असून त्यांची मानसिकता बदलण्यात यावी, अशी मागणी मिलिंद पाटणकर यांनी केली. स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी प्रशासनाने त्यांचे नियोजन स्पष्ट करावे, नॉन-कोविड रुग्णालयांनादेखील रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची मागणी केली. ऑक्सिजन ठाण्यात येत आहे, मात्र सिलिंडर रिकामे येत असल्याची धक्कादायक माहिती अशोक वैती यांनी दिली. नजीब मुल्ला यांनी या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करावी, त्यात सर्वपक्षीय नगरसेवक, जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी, एफडीएचे काही अधिकारी, पोलीस यांचा समावेश करण्याची मागणी केल्यानंतर ती स्थापण्याचा ठराव यावेळी त्यांनी मांडला.

रुग्णसंख्या वाढल्याने ताण वाढला

दुसऱ्या लाटेतही महापालिकेने योग्य तयारी केलेली आहे. काही त्रुटी असतील; परंतु प्रशासनाचे काम सुरू आहे. या लाटेत बेड उपलब्ध न होणे, रुग्णांना औषधे न मिळाल्याने नगरसेवकांचा संताप वाढला आहे, त्यामुळे नगरसेवकांनी खंत व्यक्त केली. याचा शोध घेणे गरजेचे आहे. रेमडेसिविरसह ऑक्सिजनवरून प्रशासनाला दोषी ठरविणे अयोग्य आहे. रोज रुग्ण वाढत असल्याने बेडदेखील उपलब्ध होत नाही, रुग्णांना रोज अधिकचा ऑक्सिजन लागत असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो मिळावा यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत, खासगी रुग्णालयांनाही महापालिकेने ऑक्सिजन पुरवठा केला आहे. वॉर रूमच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत: प्रयत्न केला आहे. छोट्याछोट्या चुका का होतात, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

- नरेश म्हस्के - महापौर - ठामपा