ठाणे : प्रत्येकाला स्वत:ची प्रगती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लिंगभिन्नता हा प्रगतीच्या मार्गात अडसर होऊ शकत नाही. लिंग समानता असलीच पाहिजे. महिलांनी स्वत:ला प्रयत्नपूर्वक घडवावे. राष्ट्राच्या उभारणीत सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा राज्याचे एससी, एसटी आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रभान थूळ यांनी केली.सावित्रीबाई फुले बालवाडी, रामभाऊ भिसे बालविकास मंदिर आणि रतनबुवा पाटील माध्यमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथील लोढा हेवन, निळजे येथे शनिवारी महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असताना न्या. थूळ यांनी महिलाना मार्गदर्शन केले. सन १९१०च्या अंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. सर्वप्रथम २८ फेब्रुवारी महिला दिन साजरा होत असे, त्यानंतर युनोने ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले, असेही न्या. थूळ यांनी सांगितले. या कार्यक्रमास त्यांच्या प्रमुख उपस्थितीसह जनसंपर्क अधिकारी रमेश शिंदे, संस्थेच्या अध्यक्षा सुलभा कांबळे, सचिव डॉ. रोहन कांबळे कार्यकारी अधिकारी प्रतिक्षा गमरे आदींसह महिला वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होता.महिलांचा हक्क या विषय बोलताना न्या. थूळ यांनी शबरीमल मंदिर प्रवेशाबाबतचा उल्लेखही ओझरता केला. जगातील अनेक देशांमध्ये महिलाना समान वेतन, मतदान हक्क, बाळातपणाची रजा कामाचे तास, साप्ताहीक सुटी आदींसाठी मोठा संघर्ष करावा लागला. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात भारतीय महिलाना मतदानाचा हक्क, शिक्षणाचा अधिकार, स्त्री- पुरूष समानता, व्यक्ती स्वातंत्र्य असे अनेक अधिकार दिले. म्हणून महिला पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष अशी महत्त्वाची पद भूषविताना दिसत असल्याचे न्या. थूळ यांना सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महिला सत्कारही न्या. थूळ यांच्या हस्ते करण्यात आला. स्त्रीयांनी अन्याय सहन करू नये, त्याचा प्रतिकार करावा, गुलामगिरीत राहू नयो, स्त्रीया गुलाम झाल्यास कुटुंब देखील गुलाम होईल. यावेळीच पायबंद घालण्यासाठी महिलांनी स्वाभिमानाने जीवन जगावे, स्वत:शी स्पर्धा करण्याचे धाडस अध्यक्षा सुलभा कांबळे यांनी महिला दिले.
लिंगभिन्नता प्रगतीच्या मार्गातील अडसर नाही- न्या. थूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 7:31 PM
महिलांचा हक्क या विषय बोलताना न्या. थूळ यांनी शबरीमल मंदिर प्रवेशाबाबतचा उल्लेखही ओझरता केला. जगातील अनेक देशांमध्ये महिलाना समान वेतन, मतदान हक्क, बाळातपणाची रजा कामाचे तास, साप्ताहीक सुटी आदींसाठी मोठा संघर्ष करावा लागला. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात भारतीय महिलाना मतदानाचा हक्क, शिक्षणाचा अधिकार, स्त्री- पुरूष समानता, व्यक्ती स्वातंत्र्य असे अनेक अधिकार दिले
ठळक मुद्देसन १९१०च्या अंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार जागतिक महिला दिनसर्वप्रथम २८ फेब्रुवारी महिला दिन साजरा होत असे