शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे लक्ष वेधन्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यात पाळला लक्षवेध दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 19:42 IST

मागण्यांवर त्वरीत निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अन्यथा ९ जुलै रोजी गांधीजींच्या पुतळ्याजवळ मुंबई येथे मौन दिन पाळण्याचा निर्णय यावेळी अधिका-यांनी घेतला.

ठळक मुद्देकेंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावाकेंद्राप्रमाणे दोन वर्षाची बालसंगोपन राजा मिळावीएक लाख ७५ हजार रिक्त पदे त्वरीत भरावेत

ठाणे : प्रलंबित प्रश्नांसंबंधात शासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शासनाचे लक्ष वेधन्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये गुरूवारी लक्षवेध दिन पाळला. यावेळी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. यानंतर राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिका-यांनी प्रमुख मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्याकडे सुपुर्द केले.केंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावा. सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे. डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट ६५ वर्षे करा. एक लाख ७५ हजार रिक्त पदे त्वरीत भरावेत. महिला कर्मचा-यांना केंद्राप्रमाणे दोन वर्षाची बालसंगोपन राजा मिळावी, या मागण्यांचे निवेदन लक्षवेध दिना निमित्त निवासी उपजिल्हाधिका-यांना सुपूर्द केले. मागण्यांवर त्वरीत निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अन्यथा ९ जुलै रोजी गांधीजींच्या पुतळ्याजवळ मुंबई येथे मौन दिन पाळण्याचा निर्णय यावेळी अधिका-यांनी घेतला. या लक्षवेध दिनाच्या कार्यक्रमात महिला दुर्गा मंचच्या अध्यक्षा मनाली तांबडे, जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष शहाजी पाटील, उप अध्यक्ष मोहन पवार, कोकण विभागीय महिला संघटक डॉ. तरु लता धानके, ठाणे जिल्हा समन्वय सचिव डॉ.अविनाश भागवत आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी