शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपी गजाआड

By admin | Updated: February 1, 2017 04:05 IST

भार्इंदरच्या गोल्डन नेस्ट वसाहतीत दीपिका कार्तिक संघवी (२९) व तिची आठ वर्षाची मुलगी हेत्वी यांच्या हत्येप्रकरणी विनायक उर्फ विकी रमेश अपूर (२२) याला

मीरा रोड : भार्इंदरच्या गोल्डन नेस्ट वसाहतीत दीपिका कार्तिक संघवी (२९) व तिची आठ वर्षाची मुलगी हेत्वी यांच्या हत्येप्रकरणी विनायक उर्फ विकी रमेश अपूर (२२) याला मंगळवारी सकाळी दहिसरमधून अटक केली. विनायक हा दीपिकाचा प्रियकर होता. पैशाच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे समोर आले. दोघींची झोपेत असताना गळयाखाली चाकूने वार करत व गळा आवळून हत्या केल्याची कबूली विनायकने दिली आहे. दीपिका ही पती कार्तिकसोबत गेल्या फेब्रुवारीपासून राहत नव्हती. घटस्फोट घेणार असल्याने कार्तिक तिला ५ लाख रुपये व महिन्याला ७ हजार रुपये खर्चास देणार होता. पण त्याने पैसे दिले नाही. दीपिका व विकीची ओळख कॉल सेंटर मध्ये काम करताना झाली. त्यांचे संबंध उघड झाल्यानेच दोघांना कॉल सेंटरमधून ८ ते १० दिवसांपूर्वीच काढले होते. भार्इंदर पूर्वेला सोनम सरस्वती इमारतीत राहणाऱ्या दीपिकाकडे विकीचे येणे जाणे होते.विकी २५ च्या रात्री इमारतीत आला होता. २६ ला सकाळी स्वत:चा चेहरा लपवत तो इमारतीतून बाहेर पडला. त्या रात्री त्याचे दीपिकाशी भांडण झाल्याचे शेजारच्या मुलाने ऐकले होते. रात्री अडीचच्या सुमारास विकीने आधी दीपिकाच्या गळ्याखाली चाकूने वार केला व गळा दाबून हत्या केली. हेत्वी जागी झाल्याने तिचीही गळा आवळून हत्या केली.त्याने हेत्वीचा मृतदेह बिछान्यात गुंडाळून पलंगाच्या कप्प्यात ठेवला आणि जाताना दीपिकाचा मोबाईल घेतला. पण सीसीटीव्हीत त्याचा चेहरा दिसल्याने पोलिसांचे काम सोपे झाले. हत्येनंतर भार्इंदर रेल्वे स्थानक गाठले. चाकू वाटेतच टाकला. पालघर येथे एका नातलगाच्या दिवसकार्याला जायचे असल्याने त्याने आईला फोन करुन विरार स्थानकात कपडे घेऊन येण्यास सांगितले. गाडीतच त्याने कपडे बदलून तो घरी गेला.पोलिसांनी चौकशी सुरु केल्याचे कळताच त्याने आईने दिलेली सोन्याची चेन दहिसरच्याच सराफाकडे गहाण ठेवून १० हजार घेतले. बसने गोवा गाठले. गोव्याहून तो गाडीने मुंबईत आला. तेथून तो बसने शिर्डीला गेला. विकीने ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क साधल्यावर पोलीस पथकाने सापळा रचून विकीला रुस्तमजी शाळेजवळ पकडले. (प्रतिनिधी)दीपिकाने दिली होती आत्महत्येची धमकीदीपिका त्याच्याकडे २० ते २५ हजार मागत होती. विकी काम करत नसल्याने पैसे देणे शक्य नसल्याने दोघांमध्ये भांडण होत होते. पैसे नाही दिले तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दीपिका देत असे. यातून हत्या केल्याचे त्याने सांगितले. आधी त्याने तिला ४० हजार दिले होते. विकीने यापूर्वी काही मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते.