शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गावगाडा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST

ठाणे : समाजव्यवस्था सुरळीतपणे चालण्यासाठी सामूहिकपणे निर्माण केलेली गावगाडा ही पद्धती दीड हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात आहे. सदाशिव टेटविलकर ...

ठाणे : समाजव्यवस्था सुरळीतपणे चालण्यासाठी सामूहिकपणे निर्माण केलेली गावगाडा ही पद्धती दीड हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात आहे. सदाशिव टेटविलकर यांनी या गावगाड्याचे स्वरुप कुशलतेने रेखाटले असून त्याचा उपयोग निश्चितच संदर्भ ग्रंथ म्हणून होईल, अशा भावना भारत इतिहास संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. बी.डी. कुलकर्णी यांनी आपल्या शुभसंदेशातून व्यक्त केल्या.

कोकण इतिहास परिषद, श्रीकृपा प्रकाशन व मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर लिखित ‘गावगाडा - प्राचीन ते अर्वाचीन’ या पुस्तकाचे प्रकाशन कोविडच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले. फेसबुक लाईव्हव्दारे या पुस्तकाचे अनौपचारिक प्रकाशन निवडक उपस्थितीत मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, लेखक सदाशिव टेटविलकर, कोकण इतिहास परिषदेच्या प्रवक्त्या डॉ. विद्या गाडगीळ व प्रकाशक विश्वनाथ साळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांनी शुभसंदेशाव्दारे टेटविलकर समर्पित भावनेने करीत असलेल्या इतिहास संशोधन कार्याची प्रशंसा करून गावगाडा पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या हरवलेल्या संस्कृतीची माहिती नव्या पिढीला होईल,असा विश्वास व्यक्त केला. समतोल पद्धतीने इतिहास सांगणारे इतिहासकार म्हणून सदाशिव टेटविलकर यांची नोंद ठाण्याच्या इतिहासाला घ्यावीच लागेल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे. महापौर म्हस्के, जिल्हाधिकारी नार्वेकर, इतिहास संशोधक कुलकर्णी यांच्या शुभसंदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले.

ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी या पुस्तकाव्दारे इतिहासाचे व समाज जीवनाचे नवे दालन अभ्यासकांसाठी खुले झाले असल्याचे सांगून ग्रंथ संग्रहालयातील ऐतिहासिक पुस्तकांचा विभाग समृद्ध करण्यासाठी टेटविलकर यांनी पुढाकार घ्यावा, अशी इच्छा व्यक्त केली. कोरोनाच्या काळाने खूप काही शिकविले असून यापुढील काळात अधिक जोमाने लिखाण करण्याची उमेद इतिहास लेखक संशोधक टेटविलकर यांनी व्यक्त केली.

--------

फोटो मेलवर