शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदरच्या सोसायटीला १५ दिवसांपासून दूषित पाणी, पाइपलाइनमध्ये गटाराचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:42 IST

ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मागील १५ दिवसांपासून घोडबंदर पट्ट्यातील भूमीएकर या कॉम्प्लेक्सला पाइपलाइनमध्ये गटाराचे पाणी मिसळल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मागील १५ दिवसांपासून घोडबंदर पट्ट्यातील भूमीएकर या कॉम्प्लेक्सला पाइपलाइनमध्ये गटाराचे पाणी मिसळल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे काही नागरिकांना पोटाचे विकारदेखील झाले असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तीन पाण्याच्या लाइनपैकी दोन पाइपलाइन बदलण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेने दिली. उरलेली एक लाइन बदलण्याचे काम सुरू असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. लाइन जुनी तसेच गंजल्यामुळे हा प्रकार घडला असून अजूनही दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.भूमीएकर कॉम्प्लेक्समध्ये ३२० फ्लॅटधारक असून दूषित पाणी प्यायल्याने प्रत्येक मजल्यावरील एकतरी नागरिक आजारी पडला असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन राजेश गोनाडे यांनी दिली. सुरु वातीला केवळ दुर्गंधीयुक्त पाणी येत होते. मात्र, त्यानंतर अक्षरश: गढूळ पाणी यायला लागले असल्याचे गोनाडे यांनी सांगितले. पाण्यामध्ये अळ्यादेखील आढळल्या असल्याचे त्यांनी सांगितले. वाघबीळमधून येणारी पाण्याची लाइन विजयनगरीच्या जवळ एका गटारामधून गेली आहे. ही लाइन अतिशय जुनी असल्याने ती गंजली असून गळकी झाली होती. त्यामुळे पाण्याच्या लाइनमध्ये गटाराचे पाणी मिसळल्याने हेच दूषित पाणी घरांमधील नळांमध्ये आल्याचे त्यांनी सांगितले. आता काही प्रमाणात समस्या दूर झाली असली तरी दुर्गंधीयुक्त पाणी अजूनही येत असल्याचे सोसायटीच्या चेअरमनचे म्हणणे आहे. या परिसरात ८ इंचाच्या तीन जुन्या पाइपलाइन असून त्या भूमीएकरला पाणी पुरवतात.>पाण्याची पुन्हा तपासणी करणारया पाइपलाइन ड्रेनेजमधून जात असल्याने सोमवारी पाणीपुरवठा बंद केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी दिली. या तीनही पाइपलाइन त्या जागेवरून काढून टाकून पूर्णपणे बदलल्या आहेत. तरीही दुर्गंधीयुक्त पाणी येत असेल, तर पुन्हा पाण्याची तपासणी करण्यात येईल.