शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदार करणार मानवी साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:36 IST

मागील तीन महिन्यांपासून सागर इन्व्हेस्टमेंटच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असतानाही या कंपनीतील प्रमुख असलेल्या श्रीराम समुद्र याला अटक झालेली नाही.

बदलापूर : मागील तीन महिन्यांपासून सागर इन्व्हेस्टमेंटच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असतानाही या कंपनीतील प्रमुख असलेल्या श्रीराम समुद्र याला अटक झालेली नाही. पोलीस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता गुुंतवणूकदार करत आहेत. त्यांनी पोलिसांना जागे करण्यासाठी बदलापूरमध्ये मानवी साखळी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन १ आॅगस्टला करण्यात येणार असल्याचे शैलेश वडनेरे यांनी सांगितले.तीन महिन्यांपासून गुन्हा दाखल होऊनही सागर इन्व्हेस्टमेंटमधील घोटाळयाचा प्रमुख सूत्रधार श्रीराम समुद्र हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यातच तपासही संथ गतीने सुरू असल्याने गुतंवणुकदारांचा संयम सुटत चालला आहे.पोलिसांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून श्रीरामला अटक करावी यासाठी गुंतवणूकदार आंदोलन करणार आहेत. १ आॅगस्टला शिवाजी चौक ते बदलापूर पूर्व पोलीस ठाणे अशी मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास लकवरात लवकर करून प्रमुख आरोपीला अटक व्हावी हा एकमेव हेतू या आंदोलनामागे असल्याचे वडनेरे यांनी सांगितले. यामध्ये ठाणे, मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर येथील गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत.सागर इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांनी सुमारे चार हजार गुतंवणुकदारांना ४०० हून अधिक कोटीला गंडा घतला आहे. हा तपास सध्या ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. मात्र या तपासाला वेग नसल्याने तपास संथगतीने व भरकटत चालल्याचा आरोप गुंतवणूकदार करत आहेत. गुंतवणूकदारांनी यापूर्वीही राजकीय नेत्यांना न्याय मिळण्यासाठी साकडे घातले आहे.संचालकांची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करा अशी मागणीही मध्यंतरी करण्यात आली होती.