शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गुण कमी देण्याच्या धाकावर विद्यार्थिनींचा विनयभंग, ठामपाच्या शिक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 20:22 IST

ठाणे, दि. 28 - किसननगर येथील महापालिका शाळा क्रमांक एकच्या नववीच्या वर्गात शिकवताना मुलींशी अश्लील शेरेबाजी करीत त्यांचा विनयभंग करणा-या सुरेश मोरे (३२) या शिक्षकाला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे. त्याने वर्गातील तीन ते चार मुलींशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका मुलीने दाखल केली आहे.वागळे इस्टेट भागात राहणा-या ...

ठाणे, दि. 28 - किसननगर येथील महापालिका शाळा क्रमांक एकच्या नववीच्या वर्गात शिकवताना मुलींशी अश्लील शेरेबाजी करीत त्यांचा विनयभंग करणा-या सुरेश मोरे (३२) या शिक्षकाला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे. त्याने वर्गातील तीन ते चार मुलींशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका मुलीने दाखल केली आहे.वागळे इस्टेट भागात राहणा-या या पीडित मुलीशी त्याने २४ ते २६ जुलै दरम्यान गैरवर्तन केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या मुलीला अंतर्वस्त्र घातले आहे का? अशी विचारणा करून नंतर तिच्या अंगावरून त्याने हात फिरविला. तिच्या मैत्रिणीशीही त्याने अश्लील संभाषण केले. याबाबत कोणी तक्रार केली तर पेपरमध्ये कमी मार्क देईन, अशी धमकीही त्याने दिली.या १४ वर्षीय मुलीने धाडस करुन हा प्रकार तिच्या पालकांच्या निदर्शनास आणून दिल्यावर २७ जुलै रोजी त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात सायंकाळी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याने आणखीही चार ते पाच मुलींशी अशाच प्रकारे अश्लील वर्तन केल्याच्या तक्रारी काही मुलींनी पोलिसांकडे केल्या आहेत. त्याला तात्काळ अटक केली असून पालकांनी शाळेच्या मुख्यध्यापकांकडेही याबाबत तक्रार केली आहे................आधीच गळती त्यात गैरप्रकार..महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची आधीच वेगवेगळया कारणांमुळे पटावरील संख्या कमी होत आहे. त्यात अशा प्रकार मोरे सारख्या शिक्षकानेच मुलींशी असे गैरप्रकार केल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी कोपरी येथील पालिकेच्या शाळेतील सुरक्षा रक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. त्यानंतर पालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन सुरक्षा रक्षक मंडळाच्या सर्वच सुरक्षा रक्षकांना बदलून त्याठिकाणी राज्य शासनाचे सुरक्षा रक्षक पालिकेसह सर्व ठिकाणी तैनात केले. या पार्श्वभूमीवर आता या शिक्षकावर पालिका प्रशासन काय कारवाई करते? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.