शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

गॅस सिलिंडरने कूकची हत्या करणाऱ्या वेटरला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST

ठाणे : चायनीज दुकानात काम करताना झालेल्या भांडणाच्या रागातून गॅस सिलिंडर मारून अजित रॉय (३०) या कूकची हत्या करणाऱ्या ...

ठाणे : चायनीज दुकानात काम करताना झालेल्या भांडणाच्या रागातून गॅस सिलिंडर मारून अजित रॉय (३०) या कूकची हत्या करणाऱ्या मंजितकुमार सरोज (३५) या वेटरला ठाणे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी नुकतीच जन्मठेप तसेच मोबाइल चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावली. चार वर्षांपूर्वी भिवंडीतील एका चायनीज दुकानामध्ये हा प्रकार घडला होता.

भिवंडीतील पूर्णागावात असलेल्या तंदुरी कॉर्नर आणि चायनीज सेंटर या दुकानात वेटर मंजितकुमार याच्यासह कूक अजित तसेच अन्य कामगार असे तिघे काम करीत होते. हे सर्व कामगार दुकानातच झोपत असे. कामावरून उद्भवलेल्या वादातून दोघांनी एकमेकांना ५ जुलै २०१७ रोजी रात्री शिवीगाळ केली. यावेळी मालकाने त्यांना समजावल्यानंतर यापुढे आम्ही भांडण करणार, असे त्यांनी सांगितले. ६ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केल्यानंतर तिघेही कामगार दुकानात झोपले. मालक घरी निघून गेला; परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी येथील एका पानटपरीचालकाने फोन करून अजितला मार लागल्याची माहिती दिल्यानंतर दुकानमालक आणि त्याचा भाऊ तात्काळ दुकानावर आले. त्यांनी आतमध्ये पाहिले असता, दुकानामध्ये रक्ताच्या थारोळ्यात अजित पडल्याचे दिसले. त्याच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या शेजारीच रक्त लागलेले गॅस सिलिंडर पडले होते. त्यांनी अजितला नेमके काय झाले, याबाबत विचारल्यानंतर मंजितकुमारने झोपेतच कपाळावर गॅस सिलिंडर मारल्याची त्याने माहिती दिली. सर्वांनी मंजितकुमारचा शोध घेतला. मात्र, तो पसार झाला होता. शिवाय कामगारांची नावे आणि पत्ता लिहिलेली वही तसेच अजित याचा मोबाइलदेखील त्याठिकाणी नव्हता. अजितला उपचारासाठी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले; परंतु त्याचा मृत्यू झाला.

दुकानमालकाच्या तक्रारीनंतर उत्तर प्रदेशच्या मंजितकुमार विरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याच खटल्याची सुनावणी न्यायाधीश तांबे यांच्या न्यायालयात ३१ मार्च रोजी झाली. सर्व बाजू पडताळल्यानंतर खून प्रकरणात जन्मठेप तर मोबाइल चोरीसाठी एक वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. वर्षा चंदने यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पी. एम भालेराव यांनी केला. पोलीस हवालदार एस. एस. जाधव, कॉन्स्टेबल जी. जी. पाचेगावकर, हवालदार एस. पी. जाधव, पोलीस नाईक एस. एस. म्हात्रे यांनीही या खटल्यासाठी तपास अधिकाऱ्यांना मदत केली.