शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवंगत रमेश मोरे द्विपात्री अभिनय स्पर्धेत गार्गी-अभिराज प्रथम

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: August 16, 2022 15:29 IST

 मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे यंदाचे १० वे वर्ष होते.

ठाणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा आयोजित दिवंगत रमेश मोरे द्विपात्री अभिनय स्पर्धेत गार्गी घेगडमूळ, अभिराज भोसले या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, द्वितीय क्रमांक करिष्मा अनंत व आरती गुरव तर तृतीय क्रमांक सचिन सपकाळ आणि गणेश पाटील यांनी पटकावला.

 मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे यंदाचे १० वे वर्ष होते. गेले दोन महिने सातत्याने या स्पर्धेची तयारी सुरू होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह आनंददायी होता. एकूण अठरा जोड्या द्विपात्री स्पर्धेत सहभागी झाल्या. सिने, मालिका अभिनेत्री पल्लवी वाघ केळकर, शिरीष राणे, आणि महेश सावंत पटेल यांंनी स्पर्धेचे परिक्षण केले. उत्तेजनार्थ पारितोषिक सिद्धेश शिंदे, स्वप्निल अदरकर, अक्षता साळवी, रसिका पवार यांनी पटकावले. साक्षी देशपांडे ही विशेष लक्षवेधीची मानकरी ठरली. विजेत्या स्पर्धेकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उत्तमोत्तम कलाकृती या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता आल्या.

दैनंदिन जीवनातील अनेक विषय संहितेच्या माध्यमातून स्पर्धकांनी मांडले. या स्पर्धेचे अचूक टायमिंग साधण्यात आले हे स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे अध्यक्ष, खा. राजन विचारे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, प्रमुख कार्यवाह नरेंद्र बेडेकर, कोषाध्यक्ष आशा जोशी तसेच पद्मा हुशिंग, शितल पाटील, दुर्गेश आकेरकर, अंबरीष ओक, प्रणाली राजे, श्रृतिका मोरेकर, जयश्री पाठक, वृषाली राजे, निशिकांत महांकाळ, आदित्य संभुस, प्रकाश बोर्डे याप्रसंगी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे