शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीतील कचरा ४० टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 23:51 IST

३४० टन होतोय गोळा; लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम, मात्र डम्पिंगवर ढीग कायम

- मुरलीधर भवार कल्याण : सध्याच्या लॉकडाउनमुळे शहरांतील केवळ जीवनाश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला मार्केट, किराणा, बेकरी आणि औषधांची दुकाने सुरू आहेत. अन्य दुकाने, बाजारपेठा, कारखाने, उद्योग व इतर अस्थापने बंद असल्याने कल्याण-डोंबिवली शहरांतील कचऱ्याचे प्रमाणही ४० टक्क्यांनी कमी झाले आहे.पूर्वीच्या तुलनेत सध्या दररोज ३५० टन कचरा गोळा केला जात आहे. केडीएमसी हद्दीतून दररोज ६५० टन कचरा गोळा केला जातो. परंतु, त्यात ४० टक्क्यांनी घट झाल्याने ३५० टन कचरा डम्पिंगवर जात आहे. महापालिकेसाठी ही बाब समाधानकारक असली तरी आधारवाडी डम्पिंगवरील कचºयाचा डोंगर कमी झालेला नाही. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे डम्पिंग १५ मे पर्यंत बंद केले जाईल, असे सांगितले होते. परंतु, कोरोनामुळे महापालिकेची सगळी शक्ती कोरोनाशी मुकाबला करण्यावर खर्ची होत आहे. त्यामुळे हे डम्पिंग बंद करण्याचे लक्ष्य साध्य करता येणे शक्य नाही. मात्र, लॉकडाउनच्या काळात कचरा कमी झाला आहे.सध्या घरी असलेल्या नागरिकांनी ओला-सुका कचºयाचे वर्गीकरण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिल्यास चित्र बदलू शकते, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त गणेश बोराडे यांनी सांगितले.आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरील कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी सौराष्ट्र कंपनीने प्रक्रिया प्रकल्प उभारला होता. मात्र, प्रक्रिया करण्यात येणाºया कचºयाचे प्रमाण १०० ते १५० टन होते. तर येथे येऊन पडणारा कचरा ६५० टन आहे. त्यामुळे कचºयाचा डोंगर कमी होऊ शकला नाही. महापालिकेने उंबर्डे, बारावे आणि मांडा येथे प्रकल्प प्रस्तावित केले. त्यापैकी बारावे प्रकल्पाचे काम सुरू आहे. उंबर्डे प्रकल्प बांधून तयार असून, तेथे कचºयावर प्रक्रियेचे काम सुरू होणार होते.परंतु, सध्याच्या लॉकडाउनमुळेप्रकल्पातील कामगार गावी गेल्याने प्रकल्पाचे काम ठप्प झाले. सोमवार, २७ एप्रिलपासून या प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे, अशी माहिती केडीएमसीचे अभियंते मिलिंद गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोनाच्या दोन हजार ४०४ किलो कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रियाकोरोनाग्रस्तांच्या घरातील व सोसायटीतील कचरा स्वतंत्र वाहनातून काळजीपूर्वक गोळा करून त्याची जैववैद्यकीय कचरा प्रकल्पात शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिका हद्दीतील २० प्रभागांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.कोरोनाग्रस्तांच्या घरातील व सोसायटीमधून आतापर्यंत दोन हजार ४०४ किलो कचरा गोळा करून त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केल्याचा अहवाल अभियंता गोपाळ भांगरे यांनी केंद्रीय आरोग्य विभागास आॅनलाइनद्वारे पाठविला आहे. केंद्राकडून याबाबत महापालिकेस विचारणा करण्यात आली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdumpingकचरा