शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

दुकानांसमोर कचरा टाकणारे मोकाटच

By admin | Updated: April 26, 2017 00:25 IST

कचऱ्यावर कर लावल्यानंतर तो न भरण्याचा निर्धार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात पालिकेने कठोर पावले उचलून मागील

ठाणे : कचऱ्यावर कर लावल्यानंतर तो न भरण्याचा निर्धार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात पालिकेने कठोर पावले उचलून मागील महिन्यात त्यांच्या दुकानांसमोरच कचरा फेको आंदोलन केले होते. त्यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनीदेखील नौपाडा प्रभाग समितीच्यासमोर कचरा फेकून परतफेड करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनांमुळे संपूर्ण ठाण्याचे वातावरण ढवळून निघाले होते. व्यापाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले होते. परंतु, एक महिना झाल्यानंतरही दुकानांसमोर कचरा टाकणारे ते अधिकारी अद्याप मोकाटच फिरत असल्याचे चित्र आहे.मागील महिन्यात २३ मार्च रोजी सकाळ सकाळी पालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कचरा कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरच कचरा टाकला होता. या कचरा नाट्याच्या वेळी भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आक्र मक झाले होते. त्यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले आदींना प्रशासनाने दोन दिवसात दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना दिलेले ते आश्वासन पोकळ ठरल्याने दुकानदारांसह सर्वसामान्य नागरिकांना वेठीला धरून कचरा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल त्यामुळे वाढल्याचे मानले जात आहे. तसेच याप्रकरणी घनकचरा विभागाचे अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांच्यावरदेखील कारवाई करण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या घनकचरा विभागाला प्रशासनाने कचरा टॅक्स वसुलीतून दोन कोटी रुपयांचे लक्ष दिले होते. त्यातील केवळ ५१ लाखापर्यंतचीच वसुली झाली आहे. अशावेळी ती झाली नाही तर संबधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. अशावेळी कर वसुलीसाठी कोणतेही तारतम्य न ठेवता नौपाडा भागातील व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर कचरा आणून टाकण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यावेळी हा कचरा आम्ही टाकलाच नसल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु, पालिकेचे कर्मचारी आणि काही अधिकारी कचरा टाकतांना कॅमऱ्यात बंद झाल्याचे पुरावेच व्यापाऱ्यांनी नौपाडा पोलिसांना सादर केले होते. त्यावेळी व्यापाऱ्यांनी थेट महापालिकेत धडक देऊन संबधित दोषींवर कारवाईची मागणी केली होती. (प्रतिनिधी)