शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाºयांअभावी भिवंडीत कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:14 IST

सफाई कामगारांनी राजकीय बळाचा वापर करून व वरिष्ठ अधिकाºयांच्या संगनमताने वरिष्ठपदाच्या खुर्च्या बळकावल्या आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी कर्मचारी कमी असल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे

भिवंडी : सफाई कामगारांनी राजकीय बळाचा वापर करून व वरिष्ठ अधिकाºयांच्या संगनमताने वरिष्ठपदाच्या खुर्च्या बळकावल्या आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी कर्मचारी कमी असल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.महापालिकेच्या आस्थापना विभागात सुमारे २४०० सफाई कर्मचारी आहेत. त्यापैकी किमान १००० ते १२०० कर्मचारी वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने मुख्य कार्यालयात आणि पाच प्रभाग समिती कार्यालयामध्ये वरिष्ठ पदांवर काम करत आहेत. वास्तविक शहराच्या लोकसंख्येनुसार सफाई कर्मचाºयांची भरती झालेली असताना ते या विभागात काम करत नसल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास भोगावा लागत आहे. शहरात रोज कचरा उचलला जात नाही. तसेच गटारे, नाले साफ होत नाहीत. त्यामुळे अस्वच्छतेमुळे मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू सारख्या साथीचे आजार पसरले आहेत.ज्यांची मूळ पदे सफाई कामगार आहेत त्यांना त्या ठिकाणी काम करण्याचे आदेश अनेकवेळा दिलेले असताना त्या कामगारांनी औद्योगिक न्यायालय आणि उच्च न्यायालयात प्रशासनाविरोधात दावे दाखल केले. या दाव्यांचा निकाल देताना दोन्ही न्यायालयांनी या कामगारांना आरोग्य विभागातील मूळपदीच काम करावे,असे निर्णय दिलेले आहेत. परंतु महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. जे काही सफाई कर्मचारी आरोग्य विभागामध्ये हजर झाले आहेत ते सफाईचे काम करत नाही. अशा सफाई कर्मचाºयांना आरोग्य निरीक्षक व आरोग्य अधिकारी सांभाळण्याचे काम करतात असा आरोप होत आहे.संबंधित अधिकाºयांना बडतर्फ करा!आदेशाचे पालन न करणारे सफाई कामगार, केबिन आरोग्य अधिकारी व याचा अहवाल न देणारे सफाई निरीक्षक यांना त्वरित बडतर्फकरावे,अशी मागणी लोकहित विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनद्वारे केली आहे.