शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गुरुला शिष्याची गानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 16:44 IST

गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांनी गायिलेल्या उर्दू, हिंदी, कन्नड, संस्कृत रचना सादर करीत त्यांचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांनी आपल्या गुरूला स्वरांजली वाहिली

कल्याण- गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांनी गायिलेल्या उर्दू, हिंदी, कन्नड, संस्कृत रचना सादर करीत त्यांचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांनी आपल्या गुरूला स्वरांजली वाहिली. प्रेक्षकांनी फारश्या न ऐकलेल्या किशोरीताईच्या दुर्मिळ रचना ऐकताना प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते ते रमलखुण आणि सुभेदारवाडा कट्टा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वरांजली’ या कार्यक्रमाचे.     सुभेदारवाडा हायस्कूलच्या पटांगणात या कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. पं. रघुनंदन पणशीकर यांनी मैफीलीत रंग भरले. प्रेक्षकांकडून गाण्याच्या फमाईश येत होत्या. त्या फमाईश पूर्ण करण्याचा ही प्रयत्न पणशीकर यांनी केला.     पणशीकर यांनी भजन सादर करून कार्यक्रमाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी ‘‘मेरे तो गिरधार गोपाळ’’ हे गीत सादर केले. अमोणकर या प्रयोगशील होत्या. सतत त्यांचे प्रयोग सुरू असत. त्यातूनच त्यांनी वेस्टर्न म्युङिाकचा प्रभाव असलेली रचना तयार केली होती ती रचना पणशीकर यांनी सादर केली. ‘‘तुम्हारे कारण सर्वसुख छोडा, अब मोहिनी तु तरसावा’’ ही त्यांची वेस्टर्न बाज असलेली रचना ऐकताना प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. गुरुनानकांचे भजन ‘‘काहे रे बन गोजण जाये’’ हे सादर करून पणशीकर यांनी सारे वातावरण भक्तीमय केले. राजस्थानी फोक हे वैशिष्टय़ असलेले मीराबाईंचे भजन ‘‘आली मन न लागे वृंदावन’’ हे सादर केले. अमोणकर यांनी निगुणी भजनाप्रमाणो उर्दू गझलचा अभ्यास केला होता. 80- 90 च्या दशकात त्यांनी हा अभ्यास केला. त्या संगीताचा विविध पध्दतीने अभ्यास करीत असत. त्यांनी कन्नडमध्ये गायिलेल्या दोन ते तीन रचना ही त्यांनी सादर केल्या. पणशीकर यांनी ‘तमन्ना हो तो जिंदा आरजू को जवा कर दो’’ आणि ‘‘दिल के बहलाने की तकदीर तो है, तू नही है तेरे तस्वीर तो है’’ या गझल सादर करून प्रेक्षकांवर गारूड घातले. याशिवाय ‘जमाना याद तेरा ये दिल नादान आणि ये मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ या गझल त्यांनी सादर केल्या. प्रेक्षकांच्या आग्रहखातर संस्कृत रचना असलेला श्लोक सादर केला. किशोरी अमोणकर यांनी 2 ते 3 भावगीते ही गायिली होती. त्यातील एक भावगीत ज्यांची रचना शांता शेळके यांची असून हदयनाथ मंगेशकर यांनी त्याला संगीत दिले आहे. ‘जाईन विचारत रानफुला ’ हे सादर करताच प्रेक्षकांनी टाळ्य़ाच्या कडकडाटात दाद दिली. फोटो आहे.