शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरच्या दल लेकमधील हाऊसबोटीत विराजमान टिळकनगरचा बाप्पा

By अनिकेत घमंडी | Updated: September 18, 2023 18:57 IST

प्रसिद्ध कलादिग्दर्शक आणि माजी टिळकनगरवासिय संजय शशिकांत धबडे यांची रौप्यमहोत्सवी कलाकृती

डोंबिवली: अमृतमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आणि डोंबिवलीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात यावर्षी काश्मिरच्या दल सरोवरातील हाऊस बोटीत विराजमान बाप्पाचा देखावा साकारला जात आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक आणि माजी टिळकनगरवासिय संजय शशिकांत धबडे यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी यावर्षीची रौप्यमहोत्सवी सजावट आहे. 

धबडे यांच्याशी बोलताना पुढच्या अमृतमहोत्सवी वर्षात मंडळातर्फे डोंबिवलीच्या हम संस्थेला काश्मीरमधील दोन शाळांमध्ये सायन्स लॅब उभारण्यासाठी निधी संकलन‌ करुन देण्याचा मंडळाचा मानस असल्याचे मंडळाने  सांगितले, त्यामुळे आपण काश्मिरशी निगडीत सजावट संकल्पना घेऊया असे ठरले.त्यामुळेच  संजय धबडे यांच्या संकल्पनेतून त्यांचा सहकलाकारांसह काश्मिरच्या दल सरोवरातील हाऊसबोटीत विराजमान गणेशाची सजावट संकल्पना घेऊन एक आकर्षक सजावट साकारत आहेत.

काश्मिरी कोरीवकाम केलेली हाऊस बोट तसेच दोन शिकारे आणि सभोवताली केलेला दल सरोवराचा आभास आणि मंद काश्मिरी संगीत यामुळे गणेश भक्तांना काश्मिरच्या दल सरोवरात आल्याचा भास होईल असे संजय धबडे म्हणाले. तसेच तेथील दोन्ही शिकाऱ्यांमध्ये बसून फोटो काढण्याचा मोह आवरणार नाही असेही धबडे म्हणाले. पुढे ते म्हणाले माझे बालपण आणि उमेदीचा काळ ज्या टिळकनगरात गेला त्या नगरातील सजावट सलग २५ वर्ष करायला मिळाल्याचा आनंदही खूप होत आहे.

डोंबिवलीकर खूप रसिक आहेत आणि दरवर्षी माझी सजावट संकल्पना बघून माझे मित्र, नगरवासिय आणि डोंबिवलीकर मला फोन करून सजावटीबद्दल अभिप्राय देतात त्यामुळे मला मी केलेल्या कामाचा आनंद मिळतो आणि समाधानही वाटते. पुढील अनेक वर्षे बाप्पाची इच्छा असेल तर टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सजावट करण्याची माझी इच्छा आहे असेही संजय धबडे म्हणाले. तसेच पुढच्या अमृतमहोत्सवी वर्षात मंडळाच्या सजावटीत एक भव्यदिव्य कलाकृती साकारण्याचा मानसही धबडे यांनी बोलून दाखवला.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी