शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या गायी चोरणाऱ्यांची टोळी सक्रिय

By admin | Updated: July 30, 2015 23:03 IST

अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भटक्या गाय चोरणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय झाली आहे. रात्रीच्यावेळी गायीला बेशुध्द करुन त्यांना चोरण्याचे प्रमाण वाढले आहे.

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भटक्या गाय चोरणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय झाली आहे. रात्रीच्यावेळी गायीला बेशुध्द करुन त्यांना चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. या गायी चोरुन त्यांच्या मांसाची विक्री करण्यात येत आहे. या गाय चोरांकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भटक्या गायींचे प्रमाण मोठे आहे. दिवसभर चरल्यानंतर रात्री ह्या गायी विसाव्यासाठी मोकळ्या मैदानांवर बसतात. या गायींच्या कळपातील किमान एका गायीला चोरुन नेण्याचा सपाटा काही समाजकटंकांनी सुरु केला आहे. चोरलेल्या गायीची विक्री थेट मास विक्रेत्यांकडे करण्यात येत आहे. तर काही मास विक्रेत्यांनीच स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा गाय चोरण्यासाठी उभारली आहे. अंबरनाथमधील चिंचपाडा, कोहजगांव, शास्त्रीनगर, बुवापाडा, मोरीवली, नालंबी गांव परिसर, शिवाजीनगर, लोकनगरी, हरीओम पार्क परिसर, चिखलोली गांव या परिसरातील भटक्या गायी चोरण्यासाठी ही टोळी रात्रीच्यावेळी सक्रिय असते. असाच प्रकार बदलापूरातही घडत आहे.रात्री १२ नंतर या टोळीतील दोघे दुचाकीवरुन गायींच्या कळपांची पाहणी करतात. एकांत मिळताच त्यातील मागे बसलेला चोर या गायींपैकी एखाद दुसऱ्या गायीला बेशुध्द करणारे औषध असलेले पाव देऊन बेशुध्द करतात. चार चाकी गाडीतून काही चोरटे गायीजवळ आल्यावर काही क्षणात या गायींचे पाय बांधून त्यांना अवघ्या मिनिटभरातच गाडीत कोंबतात. त्यासाठी हे दुचाकीस्वारही त्यांना मदत करतात. खास गाय चोरण्यासाठी ही गाडी तयार करण्यात आलेली असते. चोरलेल्या गायी याच परिसरातील मास विक्रेत्यांकडे पाठविण्यात येतात. गाय चोरण्याचा हा प्रकार लक्षात आल्यावर कोहजगांवातील ग्रामस्थांनी गाय चोरांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. चिंचपाडा आणि कोहजगांव परिसरातील भटक्या गायींना एकत्रित करुन त्यांचे संरक्षण करण्याचे काम गावातील तरुणांना देण्यात आले आहे. हे तरुण देखील रात्रभर जागून या गायींचे संरक्षण करित आहेत. आता पोलीस देखील याच तरुणांची मदत घेत आहेत. पोलीसांना रात्रीच्यावेळी एखादी गाय बेशुध्द अवस्थेत दिसल्यास त्याची माहिती स्वत: पोलीस या तरुणांना देतात. ही माहिती मिळाल्यावर गायींना शुध्दीवर आणून त्यांना संरक्षित ठिकाणी हे तरुण नेतात. कोहजगांवातील तरुणांनी सुरु केलेले काम आता अंबरनाथच्या इतर परिसरातही सुरु केल्यास गाय चोणा-यांवर आळा बसण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)