शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

प्रवाशांना लुटणारी सहा जणांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:01 IST

आरोपींना चार दिवसांची कोठडी : अंधाराचा फायदा घेत दोन साथीदारांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी

कल्याण : रेल्वे स्थानक तसेच बस आगारातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या सहा जणांच्या टोळीला महात्मा फुले चौक पोलिसांनी सोमवारी गजाआड केले. त्यांचे अन्य दोन साथीदार पोलिसांना हुलकावणी देऊन फरार झाले. आरोपींना कल्याण न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.कल्याण पश्चिमेतील झुंझारराव मार्केट परिसरातून चालत जाणाºया प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुबाडले जात असल्याच्या तक्रारी महात्मा फुले चौक पोलिसांकडे वाढल्या होत्या. त्याअनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आणि त्यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला. सोमवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास याठिकाणी समाधान मोरे (४५, रा. कल्याण), निलेश शेलार (१९, रा. उल्हासनगर), काल्या सावंत (२५, रा. कल्याण), गोकूळ सोनवणे (२६, रा. जळगाव), सम्राट शिंदे (२५, रा. कल्याण) आणि नदीम पठाण (३०, रा. कल्याण) हे संशयास्पदरित्या फिरताना पथकाला आढळले. पोलिसांच्या पथकाने या सहा जणांना घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. सहा जणांच्या अंगझडतीमध्ये पोलिसांना चाकू, मिरची पूड आढळून आली. पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रवाशांना लुटण्याच्या उद्देशाने आपण आल्याची कबुली त्यांनी चौकशीदरम्यान दिली. या टोळीविरोधात पंधराहून अधिक गुन्हे दाखल असून त्यांनी आतापर्यंत किती जणांना लुबाडले आहे याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.रिक्षाचालकाला लुटणारा अटकेतकल्याण : रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची वाट पाहत उभा असलेल्या एका रिक्षाचालकावर चाकू हल्ला करत त्याच्याकडील रोकड लांबवणारा सोनू गुज्जर (२३, रा. पत्री पूल परिसर) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली.पश्चिमेतील एसटी आगाराबाहेर रिक्षाचालक निसार खान (३२, रा. कचोरे) रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास प्रवाशांची वाट पाहत उभा होता. यावेळी, तेथे आलेल्या सोनूने चाकूचा धाक दाखवत ‘जेब मै कितना पैसा है, निकाल बाहर,’ असे निसारला धमकावले. पैसे देण्यास नकार देणाºया निसारवर चाकू हल्ला करून त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड सोनूने जबरदस्ती काढून घेतली. यावेळी, निसारने केलेल्या आरडाओरड यामुळे रिक्षा स्टॅण्डवरील अन्य रिक्षाचालकांनी सोनूला पकडले. याचदरम्यान, रात्रीची गस्त घालणाºया पोलिसांनी सोनूला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. तेव्हा, सोनूच्या खिशात निसारचे पैसे पोलिसांना आढळले. निसारच्या तक्रारीवरून सोनूला अटक केल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांनी दिली.ठाण्यात रिक्षातील प्रवाशाचा मोबाइल हिसकावून पलायनएकीकडे जबरी चोºया रोखण्यासाठी पोलिसांनी गस्तीची व्यूहरचना केलेली असतानाच जबरी चोऱ्यांचे आव्हान कायम आहे. लोकमान्यनगर येथील रहिवासी रामसेवक कोरी (४२) हे रिक्षाने जात असताना त्यांच्या हातातील मोबाइल मोटारसायकलने आलेल्या दोघांनी हिसकावल्याची घटना वसंतविहार भागात रविवारी घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. कोरी हे २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.५० वाजताच्या सुमारास जय गुरुदेव महाराज यांच्या दर्शनासाठी भार्इंदर येथे रिक्षाने जात होते. ते निळकंठ ग्रीन सोसायटीच्या पुढे असलेल्या युनिबेक्स कंपनीच्या समोर आले, त्यावेळी त्यांच्या रिक्षाच्या पाठीमागून आलेल्या मोटारसायकलस्वारांपैकी मागे बसलेल्याने त्यांना आधी मुंब्रा येथे जाण्याचा रस्ता विचारण्याचा बहाणा केला. नंतर त्यांच्या हाताला जोरदार झटका देऊन त्यांचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या धुमश्चक्रीत ते रिक्षातून पडल्यानंतर त्यांनी कोरी यांना हाताच्या चापटीने मारहाण करून त्यांचा मोबाइल हिसकावला. त्यावेळी त्यांच्यासह अन्य एका विनाक्रमांकाच्या स्कूटरवरून आलेल्या दोघांसह चौघांनी तिथून पलायन केले. याप्रकरणी कोरी यांनी २३ फेब्रुवारी रोजी चितळसर पोलीस ठाण्यात जबरी चोरीची तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :Arrestअटक