शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

गणेशोत्सव व्यक्तिमत्त्व विकासाचे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:48 IST

मंडळाच्या नियमानुसार दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी मंडळात कार्यकर्ता म्हणून जाऊ लागलो.

हिमांशू जोशीटिळकनगर गणेशोत्सव मंडळाची ओळख केवळ एक गणेशोत्सव मंडळ म्हणून सीमित नसून ते व्यक्तिमत्त्व विकासाचे विद्यापीठ आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट (व्यक्तिमत्त्व विकासासाठी) आज निरनिराळ्या मोठ्या संस्थांमार्फत प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. यामध्ये व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी काही उपक्र म हाती घेतले जातात. पण, माझा व्यक्तिमत्त्व विकास झाला, तो केवळ मी मंडळाचा कार्यकर्ता झालो म्हणूनच.

मंडळाच्या नियमानुसार दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी मंडळात कार्यकर्ता म्हणून जाऊ लागलो. त्यावेळेस संदीप वैद्य मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा मंडळातला कार्यकर्ता म्हणून प्रवास सुरू झाला. गणेशोत्सवासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करताना प्रसंगी तोंडावर दार लावून घेतल्यावर अपमान सहन करण्याची शिकवण मिळाली, तर काही ठिकाणी घरात घेऊन तोंड गोड केल्याशिवाय वर्गणी देणार नाही, असं सांगणारे प्रेमळ नागरिक भेटले. वर्गणी देण्यासाठी नागरिकांना समजावताना आपले म्हणणे पटवून देण्याचे कौशल्य विकसित होऊ लागले. वर्गणी मागताना मंडळास गरज आहे, पण मंडळ लाचार नाही, हा बारीक फरक मनात सांभाळण्याची कला अवगत होऊ लागली.

संदीपदादाचा डोंबिवलीत असलेला अफाट जनसंपर्कपाहून आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी आदराने बोलण्याची आणि नि:स्वार्थपणे जमेल तेवढी मदत करण्याची शिकवण मिळाली. मंडळाच्या विविध कार्यक्र मांतून सगळे पदाधिकारी पडेल ते काम या तत्त्वावर आपल्या पदाचा कणमात्रही अहंकार न बाळगता काम करताना पाहायला मिळाले. कोणतेच काम हे कमी दर्जाचे नसते, ही शिकवण मिळाली. मंडळाच्या सामाजिक उपक्र मांत काम करताना समाज नकळतपणे अनेक गोष्टी देत असतो, याची कल्पना आली.पुढे वैयक्तिक आयुष्यात मी वाणिज्य शाखा निवडल्याने तेव्हाचे मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे यांनी मंडळाच्या सहकोषाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. या क्षेत्रात शिकत असताना पुस्तकी ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग कसा करायचा, ते शिकायला मिळाले.सुशीलदादाच्या मार्गदर्शनाखाली बँकेत रोख व धनादेश जमा करणे, मुदतठेवी करणे, रोख काढणे हे अगदी मूलभूत व्यवहार करण्यापासून ते गणेशोत्सवाचे हिशेब ठेवणे, ताळेबंद बनवणे येथवर गोष्टी शिकण्यास मिळाल्या. पुढे मी सनदी लेखापाल झाल्यावर मंडळाचा कोषाध्यक्ष म्हणून काम करीत होतो. तेव्हा मंडळात येणाºया निधीचा जास्तीतजास्त विनियोग कसा करता येऊ शकतो, याचेही मार्गदर्शन मिळाले. आज मी मुंबईतील एका प्रतिष्ठित फर्ममध्ये भागीदार आहे. त्यामुळे मंडळात शिकलेल्या संवादकौशल्य, व्यवस्थापनकौशल्य, वेळेचं नियोजन इ अनेक गोष्टींचा आज आॅफिस सांभाळताना उपयोग होतो. मंडळात असलेल्या अनेक कार्यकर्त्यांकडून किंवा मंडळाच्या विविध उपक्रमांमार्फत संपर्कात येणाºया लोकांमार्फत अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या. अनेक कार्यक्र मांचे सूत्रसंचालन करण्याची संधी मंडळाने मला दिली. त्यामुळे मंचावरून बोलण्याची भिड चेपली. तसेच मोठ्या समुदायापर्यंत आपले म्हणणे सशक्तपणे पोहोचवण्याचे कसब शिकण्यास मिळाले. अनेक मोठ्या कलाकारांच्या संपर्कात आल्याने कर्तृत्वाने महान असणाºया लोकांशी अदबीने बोलण्याची सवय झाली आणि त्यांच्या केवळ सहवासातून अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात, याची जाणीव झाली. (सहकार्यवाह, टिळकनगर गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली)- शब्दांकन : जान्हवी मोर्येलोकमान्य टिळकांनी समाजात एकजूट निर्माण होण्याच्या उद्देशाने आणि विशेषकरून तरुणांना एकत्र करण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली. पण, कालपरत्वे गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये खूप बदल घडले. आज त्यातील एकजुटीची भावना कमी होत आहे. एकमेकांमध्ये मूर्तीची उंची, किंमत, जमा होणारी देणगी यावरून स्पर्धा सुरू झाली आहे. काही ठरावीक मंडळे आजही आपली परंपरा जोपासत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. त्यापैकी एक म्हणजे डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.

टॅग्स :thaneठाणेGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019