शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पावरही आले जीएसटीचे ‘विघ्न’

By admin | Updated: July 16, 2017 02:33 IST

१ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीचा फटका गणेशमूर्तींनाही बसला असून त्यांच्या दरात वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक फटका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या

- प्रज्ञा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : १ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीचा फटका गणेशमूर्तींनाही बसला असून त्यांच्या दरात वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक फटका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींना बसणार असल्याची माहिती मूर्तिकारांनी लोकमतशी बोलताना दिली. अवघ्या महिनाभरात भाविकांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. यंदा गणेशोत्सव लवकर असल्याने कारखान्यांत मूर्ती वेळेत पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे बुकिंगसाठी भक्तांचीही रांग लागली आहे. १ जुलैनंतर मूर्तींचे बुकिंग करणाऱ्यांना जीएसटीचा फटका बसला आहे. दरवर्षी साधारणपणे १० टक्क्यांनी मूर्तींच्या दरात वाढ होत असते. जीएसटीमुळे ही वाढ १५ ते २० टक्क्यांनी झाली आहे, अशी माहिती मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी दिली. ज्यांनी १ जुलैआधी बुकिंग केले, त्यांना जीएसटीचा फटका बसणार नाही. जीएसटीमुळे घरगुती गणेशोत्सवापेक्षा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना फटका बसणार आहे. कारण, मंडळांचे बुकिंग उशिरा सुरू होते, अशी माहिती मूर्तीविक्रेते संतोष निकम यांनी दिली. जीएसटीमुळे वाढलेले पीओपी आणि रंगांचे दर यामुळे दरात वाढ झाली आहे. १००० रुपयांना मिळणाऱ्या मूर्तीचे दर ११०० रुपये झाले आहे. यंदाही गणेशमूर्तींमध्ये बाहुबली फिव्हर, मात्र अद्याप बुकिंग नाहीशिवलिंग खांद्यावर घेतलेल्या बाहुबलीरूपातील गणेशमूर्ती गतवर्षीच्या गणेशोत्सवात दिसून आली होती. परंतु, तिला भक्तांकडून अल्प प्रतिसाद मिळाला होता. यंदा मात्र बैठ्या बाहुबलीरूपातील गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या वर्षी बाहुबली भाग-२ चित्रपट आल्याने त्या पार्श्वभूमीवर ही मूर्ती बनवण्यात आली आहे. मात्र, तिला अद्याप भक्तांकडून मागणी आलेली नाही. त्यामुळे या वर्षीदेखील बाहुबलीरूपातील मूर्ती फलॉप जाईल, असे बोरीटकर यांनी सांगितले. बैठ्या स्वरूपातील बाहुबली गणेशमूर्ती २ पासून १० फुटांपर्यंत उंचीची आहे, अशी माहिती मूर्तिकारांनी दिली.